Advertisement

चार महिन्यांत मिनीट्रेनची सव्वालाखाहून अधिक तिकिटांची विक्री

माथेरान मिनीट्रेनला वातानुकूलित डबे जोडण्यात आल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकही मिनीट्रेनच्या आल्हाददायक सफारीचा आनंद घेताना दिसत आहेत.

चार महिन्यांत मिनीट्रेनची सव्वालाखाहून अधिक तिकिटांची विक्री
SHARES

माथेरानच्या आणि मिनीट्रेनची सफर यांमुळे राज्यातील अन्य पर्यटनस्थळांच्या तुलनेत माथेरानला प्रथम पसंती मिळते. यामुळे यंदाच्या चार महिन्यांत पावणेदोन लाख पर्यटक-प्रवाशांच्या माध्यमाने मध्य रेल्वेने एक कोटीचा महसूल मिळवला आहे.

माथेरान मिनीट्रेनला वातानुकूलित डबे जोडण्यात आल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकही मिनीट्रेनच्या आल्हाददायक सफारीचा आनंद घेताना दिसत आहेत. 

दीड पटीने प्रवासी वाढले

मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीच्या तुलनेत एप्रिलमध्ये मिनीट्रेनची तिकीटविक्री दीड पटीने वाढली. फेबुवारीमध्ये मिनीट्रेनच्या प्रवाशांची संख्या २८ हजार १९७ असून एप्रिलमध्ये ४० हजारांच्या पार पोहोचली आहे.

एक कोटीचा महसूल

यंदाच्या जानेवारी ते एप्रिल महिन्यात मिनीट्रेनमधून एक लाख ४५ हजार २८५ प्रवाशांनी प्रवास केला. गेल्या वर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत एक लाख १७ हजार ३६५ प्रवाशांनी प्रवास केला. यंदाच्या चार महिन्यांत मिनीट्रेनची सव्वालाखाहून अधिक तिकिटांची विक्री झाली. यामुळे मिनीट्रेनने एक कोटी दहा लाख ८ हजार ५८२ रुपयांचा महसूल जमा केला.

नेरळ-अमन लॉज- माथेरानदरम्यान मिनीट्रेन ऑक्टोबर महिन्यात सुरू झाली. शनिवार-रविवारी, सुट्टीच्या दिवशी लोकलने नेरळ स्थानक आणि मिनीट्रेनने माथेरान असा प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे सोमवार ते शुक्रवारच्या तुलनेत शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येतात. ३ द्वितीय श्रेणी, एक पारदर्शी डबा, आणि २ द्वितीय श्रेणी कम लगेज डबा अशा संरचनेत मिनीट्रेन धावते.



हेही वाचा

माथेरानच्या मिनी ट्रेनचा प्रवासही वातानुकूलित, सलून कोचची जोडणी

माथेरानचे सौंदर्य पहा व्हिस्टाडोम कोचमधून, डोंगर-दऱ्यांमधून धावणार ‘ब्लॅक ब्युटी’

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा