मुंबईतील (mumbai) पावसाळ्यात पुन्हा एकदा खड्ड्यांचा (potholes) धोका निर्माण झाला आहे. जून ते जुलैच्या मध्यापर्यंत 6,758 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. अंधेरी पश्चिम (andheri) (के/पश्चिम वॉर्ड) 488 तक्रारींसह यादीत अव्वल स्थानावर आहे.
तसेच भांडुप (bhandup) (एस वॉर्ड) 453 तक्रारींसह दुसऱ्या स्थानावर आहे. तथापि, गेल्या वर्षभरात खड्डे दुरुस्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यात प्रमाणात मोठी घट झाल्याचे अधिकाऱ्यांनी नोंदवले.
पावसाळ्यापूर्वी शहरातील 49% रस्ते खड्डेमुक्त करून मुंबई खड्डेमुक्त करण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता. परंतु आकडेवारीवरून असे दिसून येते की या वर्षी तक्रारींची संख्या वाढली आहे.
2022 मध्ये सुरू झालेल्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरण प्रकल्पाचे उद्दिष्ट खड्डे दूर करणे आहे. तसेच उर्वरित काम ऑक्टोबरमध्ये पुन्हा सुरू करण्याचे नियोजन आहे. 1 जून ते 15 जुलै दरम्यान खड्ड्यांचे अहवाल 2024 मध्ये 6,231 वरून 2025 मध्ये 6,758 पर्यंत वाढले आहे.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी महापालिकेने प्रत्येक वॉर्डमध्ये दैनंदिन तपासणीसाठी रस्ते अभियंते तैनात केले, तर नागरिकांनी सोशल मीडिया, नागरी आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाइन आणि 'माय पॉथोल क्विक फिक्स' अॅपद्वारे तक्रारी नोंदवल्या.
एकूण तक्रारींपैकी 3,461 तक्रारी या डिजिटल चॅनेलद्वारे प्राप्त झाल्या आहेत तर 3,297 तक्रारी पालिका अभियंत्यांनी ओळखल्या आहेत. पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी महापालिका दररोज 8 ते 10 मॅस्टिक कुकर वापरते.
"2024 मध्ये, दुरुस्ती आणि मान्सूनपूर्व देखभालीसाठी 25,632 मेट्रिक टन मॅस्टिक वापरण्यात आले होते, परंतु यावर्षी आतापर्यंत फक्त 6,548 मेट्रिक टन मॅस्टिक वापरण्यात आले आहे. मॅस्टिक कुकर वापरण्याचे प्रमाणही कमी झाले आहे, 2024 मध्ये दररोज 33 इतके मॅस्टिकचे प्रमाण होते जे या वर्षी 24 इतके होते." असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
अधिकाऱ्याने पुढे असेही सांगितले की, "सुरक्षेचे धोके टाळण्यासाठी खड्डे लवकर ओळखून दुरुस्त करण्याचे आमचे ध्येय आहे."
या वर्षीही, मुंबई महापालिकेने (brihanmumbai municipal corporation) त्यांच्या 227 वॉर्डमध्ये प्रत्येकी एक रस्ता अभियंता नियुक्त केला आहे, जो 10 ते 15 किमीच्या परिघात दररोज तपासणी करण्यासाठी आणि खड्ड्यांच्या तक्रारी 24 ते 48 तासांच्या आत सोडवण्यासाठी जबाबदार आहे.
डांबरी आणि पेव्हर-ब्लॉक रस्त्यांचे काँक्रीटीकरण अद्याप झालेले नाही, यासाठी महापालिकेने (bmc) दुरुस्तीसाठी 154 कोटी रुपये वाटप केले आहेत, जे गेल्या वर्षी 205 कोटी रुपये होते.
मुंबईचे रस्ते जाळे 2,050 किमी पसरलेले आहे, त्यापैकी 1,333 किमी आधीच काँक्रीटीकरण झाले आहे. उर्वरित 700 किमी डांबरी आणि पेव्हर-ब्लॉक रस्ते या 17,000 कोटी रुपयांच्या मेगा मोहिमेत काँक्रीटीकरण केले जातील.
या प्रकल्पाचे उद्दिष्ट शहरातील 700 किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे आहे. पहिल्या टप्प्यात 320 किमी (700 रस्ते) आणि दुसऱ्या टप्प्यात 378 किमी (1421 रस्ते) सामाविष्ट केले आहे.
हेही वाचा