Advertisement

मुंबई पोलिसांच्या ७० टक्के कर्मचार्‍यांचं लसीकरण पूर्ण

अहवालानुसार, मुंबई पोलिसांच्या ७० टक्के कर्मचार्‍यांना लसीकरण करण्यात आलं आहे.

मुंबई पोलिसांच्या ७० टक्के कर्मचार्‍यांचं लसीकरण पूर्ण
SHARES

अहवालानुसार, मुंबई पोलिसांच्या ७० टक्के कर्मचार्‍यांना लसीकरण करण्यात आलं आहे. तर ९२ टक्के पोलिसांना कोरोनव्हायरसचा पहिला डोस मिळाला आहे.

तर ३ हजार ३८९ पोलिस अधिकाऱ्यांचं लसीकरण करण्यासाठी विभागानं प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २९ हजार २४२ पोलिस कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत. जे पोलिस दलाच्या ७०.१३ टक्के इतके आहे.

दरम्यान, ज्यांनी कोरोनाची पहिली लस घेतली नाही अशांना दुसरे गंभीर आजारा आहेत किंवा काही नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत. शिवायत यात काही महिलांचा समावेश आहे ज्या गरोदर आहेत किंवा नुकत्याच बाळंतिण झाल्या आहेत. सध्या यांना त्वरित लस घेता येणार नाही.

पोलिसांनी लॉकडाऊनमध्ये आघाडिवर काम केलं. यामुळे अनेक पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. आता कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत नाही. पण तरीही सध्या दलात ८९ सक्रिय रुग्ण आहेत. तर ८ हजार ९३१ पोलिस अधिकाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.

दुसरीकडे, मुंबई पोलिस आयुक्तालयानं अलीकडेच संबंधित टीमला शहरातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या. तथापि, काही खासगी संस्थांनी अद्याप निर्देशांची अंमलबजावणी केली नाही आणि या संदर्भात त्वरित आदेश देण्यात आले आहेत.

अहवालानुसार, पोलिस आयुक्तालयानं खासगी आस्थापनांना हद्दीत सुरक्षा हेतूनं सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सांगितलं होतं. यासंदर्भातील माहिती पोलिस उपायुक्त (ऑपरेशन्स) एस.चैतन्य यांनी दिली. त्यांनी सांगितलं की, या निर्णयामागील हेतू हा होता की सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासात उपयोगात आणले जातील जे गुन्हेगारी नियंत्रण करण्यात मदत करतील.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा