पालकांनी मुलांना अशा प्रकारे द्यावी वागणूक

 Mumbai
पालकांनी मुलांना अशा प्रकारे द्यावी वागणूक
Mumbai  -  

सध्याच्या स्पर्धेच्या युगात ताणतणाव कमी करून बालक-पालक यांच्यात मैत्रीपूर्ण नाते निर्माण व्हावे, या उद्देशाने रविवारी संध्याकाळी मुलुंडमध्ये एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये मुलांच्या मनोवृत्तीचा विचार करून त्यांना कशाप्रकारे वागणूक दिली पाहिजे, मुलांची मनोवृत्ती त्यांच्या वाढत्या वयानुसार कशाप्रकारे बदलते, मुलांना त्यांच्या आवडीनुसार शिक्षण देणे किती गरजेचे असून त्यांना त्यातच करियर करून द्यावे अशा अनेक प्रश्नांवर प्रबोधन करण्यात आलं. पालक आणि पाल्य यांच्या अनेक शंकांचं या वेळी निरसनही करण्यात आलं. तर अविनाश हांडे यांनी आपल्या खास शैलीतून गाण्यांमार्फत पालकांना आपल्या पाल्याशी मैत्रीने वागण्याचा मोलाचा सल्ला दिला. सुरेखा गवंडे यांनी आपल्या कवितांमधून आईचे महत्त्व पाल्यांना पटवून दिले. हेरंब कला अकॅडमीच्या अध्यक्षा सविता हांडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. 'आपल्या वागणुकीतल्या काही गोष्टी मुलांच्या वयोमानानुसार कशा बदलल्या पाहिजेत, तसेच पालक राहण्यापेक्षा मित्र म्हणून राहिलो तर नातं अधिक मोकळे आणि जवळचे होते' अशा अनेक गोष्टी लक्षात आल्याचं पालक नेहा मांजरेकर यांनी सांगितलं.

शिवसेना शाखाप्रमुख दीपक सावंत यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

Loading Comments