Advertisement

पार्ले-जी कंपनीच्या बिस्किटांच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या दर

पार्ले-जी कंपनीनं बिस्किटांच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

पार्ले-जी कंपनीच्या बिस्किटांच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या दर
SHARES

पार्ले-जी कंपनीनं बिस्किटांच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं हे पाऊल उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे उचललं आहे. आपल्या प्रोडक्टवर ५ ते १० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय पार्ले कंपनीनं घेतला आहे.

मंगळवारी याबाबतची माहिती पार्ले कंपनीच्या एका अधिकाऱ्यानं दिली. ते म्हणाले की, मोठ्या प्रमाणात साखर, गहू आणि तेल यासारख्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळेच कंपनीनं बिस्किटाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

आता सहा ते सात टक्क्यांनी पार्ले कंपनीच्या सर्वात लोकप्रिय ग्लुकोज बिस्किटाची किंमत महागली आहे. त्यासोबतच कंपनीनं टोस्ट आणि केकच्या किंमती अनुक्रमे ५-१० आणि ७ ते ८ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. बिस्किटांमध्ये पार्ले-जी, हाइड अण्ड सिक आणि क्रॅकजॅक यासारख्या लोकप्रिय बिस्कीटांचा देखील समावेश आहे.

पार्ले रस्कसाठी, कंपनीनं ३०० ग्रॅम पॅकसाठी सुमारे १० रुपयांची आणि ४०० ग्रॅम पॅकसाठी सुमारे ४ रुपयांची वाढ केली आहे.

खालच्या युनिट पॅकसाठी, जे 10-20-30 रुपयांचे एमआरपी पॅक आहे, कंपनी एमआरपी कायम ठेवत आहे, परंतु ग्रामेज कमी करत आहे.

याबाबत पार्ले प्रोडक्टचे वरिष्ठ अधिकारी मयंक शाह म्हणाले की, ५ ते १० टक्क्यांची वाढ आम्ही किंमतीमध्ये केली आहे. कंपनीनं २० रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे बिस्किट आणि अन्य उत्पादनाच्या किंमती वाढवल्या आहेत. किंमती व्यवस्थित स्थिर ठेवण्यासाठी बिस्किटाच्या पाकिटाचे वजन घटवले आहे.

सातत्यानं उत्पादन शुल्कांमधील वाढणाऱ्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. त्याचबरोबर कच्च्या मालाच्या किंमती सातत्यानं वाढत आहे. कंपनीला याचा फटका बसत आहे. खाद्यतेलासारख्या साहित्याच्या किंमतीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ५०-६० टक्क्यांनी वाढल्यामुळे आपल्या प्रोडक्ट्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय कंपनीनं घेतल्याचं शहा म्हणाले.

यंदाच्या आर्थिक वर्षातील पार्ले कंपनीकडून करण्यात आलेली ही पहिली वाढ आहे. याआधी जानेवारी-मार्च २०२१ या तिमाहीत कंपनीनं आपल्या प्रोडक्ट्सच्या किंमती वाढवल्या होत्या. पण ही वाढ २०२०-२०२१ या आर्थिक वर्षातील होती.हेही वाचा

महापालिका ३ वर्षांत पेग्विन देखभालीसाठी करणार १५ कोटींचा खर्च

झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक शौचालयांचा 'तो' प्रकल्प महापालिकेनं केला रद्द

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा