Advertisement

मुंबईत सोमवारपासून 10 टक्के पाणी कपात

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात पाऊस नसल्यानं पाणीसाठ्याची पातळी खालावली आहे.

मुंबईत सोमवारपासून 10 टक्के पाणी कपात
SHARES

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात पाऊस नसल्यानं पाणीसाठ्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने पाणी पुरवठ्यात 10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने ठाणे, भिवंडी महापालिका आणि इतर गावांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यातही ही 10 टक्के पाणी कपात लागू होणार आहे.  मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सोमवारपासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. 

दमदार पाऊस होऊन मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये उपयुक्त जलसाठ्याची स्थिती सुधारेपर्यंत ही कपात करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांना जेवढा पाणीपुरवठा केला जातो, त्यामध्ये देखील ही 10 टक्के कपात लागू राहणार आहे.

महापालिकेने मुंबईकरांना पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती पाहता दैनंदिन पाणी वापर काटकसरीने आणि काळजीपूर्वक करावा असे आवाहन मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा