Advertisement

सरकत्या जिन्यांकडे रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्ष

सरकत्या जिन्यामुळं चेंगराचेंगरीच्या घटनांत वाढ होत आहे. त्यामुळं आता रेल्वे प्रशासनानं वेळीच खबरदारी होणं आवश्यक असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे.

सरकत्या जिन्यांकडे रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्ष
SHARES

पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) एल्फिन्स्टन (प्रभादेवी) स्थानकातील पादचारी पूलावर (FOB) चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र, अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी रेल्वे प्रशासनानं स्थानकांमध्ये (Railway Station) सरकते जिने बसविण्याचा निर्णय घेतला. मात्र, या सरकत्या जिन्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी होऊन चेंगराचेंगरीची घटना घडण्याची शक्यता आहे.

काहीच दिवसापूर्वी पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकातील (Andheri Station) सरकता जिना उलट्या दिशेनं फिरल्यानं खाली पडून एक प्रवासी जखमी झाला. तसंच, काही प्रवाशांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यामुळं आधी जिन्यामुळं आणि आता सरकत्या जिन्यामुळं चेंगराचेंगरीच्या घटनांत वाढ होत आहे. त्यामुळं आता रेल्वे प्रशासनानं वेळीच खबरदारी होणं आवश्यक असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) सरकत्या जिन्यांसाठी २७९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सध्या बसविण्यात आलेल्या सरकत्या जिन्यांना एक वर्षही पूर्ण झाले नाही, तरीही अशा घटना घडत आहेत.

१८ फेब्रुवारी रोजी अंधेरी स्थानकातील (Andheri Station) प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर सरकत्या जिन्याच्या ब्रेक यंत्रणेत बिघाड झाला. परिणामी, प्रवासी चढत असताना जिना वरच्या दिशेनं जाण्याऐवजी अचानक खालच्या दिशेनं गेला. अनेकदा स्थानकांमधील सरकते जिने बंद असतात. त्यामुळं ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, दिव्यांग प्रवासी यांना जिना चढून जावं लागतं.हेही वाचा -

तिरंगा वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या बहाद्दराचा सत्कार

२६/११ प्रकरणाची फेरचौकशी करा, भाजपच्या नेत्याची मागणीसंबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा