पेव्हर ब्लॉक ठरले अपघाताला निमंत्रण

 Chembur
पेव्हर ब्लॉक ठरले अपघाताला निमंत्रण

चेंबूर नाका - आर.सी. मार्गावरील चेंबूर नाका येथे गेल्या अनेक दिवसांपासून मुख्य रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक पूर्णपणे निघालेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी रस्त्याची मोठी दयनिय अवस्था झाली असून, या पेव्हर ब्लॉकमुळे वाहतूक कोंडी देखील होत आहे. शिवाय गेल्या काही दिवसांत अनेक दुचाकीस्वारांचा या निघालेल्या पेव्हर ब्लॉकमुळे अपघात झाल्याची माहिती येथील रवी गायकवाड या दुकानदाराने दिली आहे. पालिकेनं काही अंतरावरील रस्ता पूर्णपणे सिमेंटचा बनवला आहे. मात्र सिद्धार्थ कॉलनी समोरील या रस्त्याची गेल्या काही दिवसांपासून दयनिय अवस्था झाल्याने हा रस्ता देखील सिमेंटचा करावा, अशी मागणी देखील गायकवाड यांनी केली आहे.

Loading Comments