Advertisement

महापालिकेच्या मुख्यालयात अवतरला 'मोर'!


महापालिकेच्या मुख्यालयात अवतरला 'मोर'!
SHARES

मुंबई महापालिकेची ऐतिहासिक वास्तू यावर्षी 125 वर्ष पूर्ण करत आहे. या ऐतिहासिक वास्तूमध्ये दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच वसूबारसला आपला राष्ट्रीय पक्षी अर्थात मोर अवतरला! यावेळी या मोराला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. तुम्हीही चक्राऊन गेला असाल ना? पण हा काही खराखुरा मोर नव्हता, तर महापालिकेच्या उद्यानातील फुलांचा वापर करून हा पूर्णाकृती पुष्प मयूर महापालिकेच्या उद्यान विभागाने साकारला होता. 'पर्यावरण वाचवा आणि पर्यावरण वाढवा' हा संदेश देण्यासाठी फुलांचा मोर साकारला.

या मोरासह महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ फुलांनी साकारलेला शुभ दीपावलीचा फलकही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी आणि सोमवारी सकाळी महापालिकेच्या विविध उद्यानांमधून आकर्षक फुले, झाडांच्या तुटून पडलेल्या फांद्या आदी सामग्री जमा करून अक्षरशः खरा भासणारा हा पुष्प मयूर साकारला आहे. 

हा मोर तयार करण्यासाठी महापालिका उद्यानातील विविध रंगी ऑर्किड, पिवळा झेंडू, केशरी झेंडू, शेवंती, शोभेची फुले आणि पाने यांचा वापर करण्यात आला. मोराचा पिसारा तयार करण्यासाठी उद्यानात निर्माण होणाऱ्या कचऱ्यातील झाडांच्या फांद्यांचा वापर करण्यात आला, अशी माहिती जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा