Advertisement

मास्कचा वापर न करणाऱ्यांना आता 'इतका' दंड


मास्कचा वापर न करणाऱ्यांना आता 'इतका' दंड
SHARES

कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी महापालिकेनं मुंबईकरांना काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. तसंच, या नियम व अटींचं पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, महापालिकेनं मुंबईकरांना घराबाहेर पडताना मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. परंतु, अनेक जण या नियमाचं पालन करत नाही. त्यामुळं मास्कचा वापर न करणाऱ्यांविरुद्ध दंड आकारला जात आहे.

सुरुवातीला हा दंड १००० रुपये इतका आकारला जात होता. परंतु, ही सुरू केलेली दंडात्मक कारवाई भ्रष्टाचाराचे कुरण बनू नये म्हणून दंडाची रक्कम १००० रुपयांवरुन २०० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांसाठी मास्कचा वापर बंधनकारक आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर १००० रुपये दंड वसूल करण्याचे आदेश प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापन खात्याला दिले होते. त्यानुसार ९ एप्रिलपासून मुंबईत दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली. दंडाची रक्कम अधिक असल्यामुळे नागरिकांकडून महापालिकेवर टीका होत आहे. 

दंडाची रक्कम अधिक असल्यामुळ थोडीफार रक्कम देऊन नागरिक कारवाईतून सुटका करून घेण्याची शक्यता वाढू लागली होती. मुळात कारवाईपेक्षाही कोरोना व्हायरस टाळणं आवश्यक आहे. त्यामुळे दंडाची रक्कम २०० रुपये करण्यात आली आहे. दंडवसुलीसाठी पालिका कर्मचाऱ्यांनाच ‘मार्शल’ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा