SHARE

भायखळा - वीर जिजामाता उद्यानातील दक्षिण कोरियाहून आणलेल्या एका पेंग्विनचा मृत्यू झाला आहे. आठ पेंग्विनपैकी एका मादीचा जीवाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्याचं जिजामाता उद्यानाचे उपअधीक्षक डॉ.संजय त्रिपाठी यांनी सांगितलंय. मृत्यू झालेल्या पेंग्विनचं वय दीड वर्ष होते. त्याचे मृत्यूचे कारण अद्याप कळलेले नाही. या संदर्भात विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन यांच्यावर टीका केलीय. पेंग्विनला भारतीय वातावरण सहन होणार नाही आणि त्यामुळे त्यांचा जीव जाऊ शकतो, अशी भीती आम्ही आधीच व्यक्त केेली होती, मात्र काही जणांचा बालहट्ट पुरवण्यासाठी ही पेंग्विन मुंबईत आणण्यात आली होती, अशी टीका मनसेचे महापालिका गटनेते संदीप देशपांडे यांनी केलीय. याबाबत मनसेचे नगरसेवक महापालिका आयुक्तांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणीही करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या