Advertisement

मुंबईकरांना पेंग्विन दर्शन होणार होsss!


मुंबईकरांना पेंग्विन दर्शन होणार होsss!
SHARES

भायखळा - वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात जुलैमध्ये पेंग्विन दर्शन होणार आहे. दक्षिण कोरियाच्या सेऊल येथून आणलेले पेंग्विन आता लवकरच नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. पेंंग्विनसाठी अनुकूल असे वातारवरण तयार करण्यात आले आहे. पेंग्विन ठेवण्यात येणाऱ्या इमारतीत पेंग्विन्सला आणखी दहा दिवस निरीक्षणसाठी ठेवण्यात येणार आहे. या वातावरणात ते कसे राहतात? याची पाहणी केल्यानंतर ते नागरिकांना पाहण्याकरता उपलब्ध केले जातील असे जिजामाता उद्यानाचे अधीक्षक संजय त्रिपाठी यांनी सांगितले. या निमित्ताने पेंग्विनला पाहण्यासाठीची मुंबईकरांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा