Advertisement

ऐन दिवाळीत पाऊस, आकाश कंदिल कसे लावायचे?


ऐन दिवाळीत पाऊस, आकाश कंदिल कसे लावायचे?
SHARES

मुंबईसह उपनगरात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पावसानं विश्रांती घेतली. त्यानंतर मुंबईकरांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. हवामान विभागानं देखील मानसूननं मुंबईतून माघार घेतल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र काही दिवसांनंतर पावसानं पुन्हा मुंबईत हजेरी लावली. पावसाचं हे मुंबईकराना नकोस झालं आहे. कारण, ऐन दिवाळीच्या तोंडावर पाऊस पडतो आहे. दिवाळीत दारी कंदिल लावला जातो. परंतु, पाऊस पडत असल्यानं दारी कंदिल कसा लावयचा? असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.   

दिवाळीसाठी कापडी, कागदी कंदीलांच्या विक्रीसाठी बाजारपेठ सजलेली असतात. मात्र, यंदा बाजारात कंदिल विक्रेत्यांची गर्दी फारशी दिसत नाही. पावसामुळं या कंदिल विक्रेत्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. कंदिल विक्रीसाठी लावले असता पावसामुळं त्यांना चांगला भाव मिळत नाही. अनेक कंदिल पावसात भिजत असल्यानं नुकसान होत आहे. त्यामुळं पाऊस पुन्हा फिरून आल्यानं राज्यात दिवाळीचा उत्साह मावळल्याचं चित्र आहे.

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. मात्र येत्या २८ तारखेपर्यंत पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं यंदा फटाके फोडण्यात चटाई असलेले बच्चे कंपनीही नाराज आहेत. तसंच, अंगणात सडारांगोळी कशी काढायची? दिवे कसे लावायचे?, असे प्रश्न गृहिणींना पडले आहेत. तर, आकाश कंदिल कसे आणि कुठे टांगायचे, असा प्रश्न घरातील पुरुष मंडळींना पडला आहे.

प्लास्टिक बंदीमुळं प्लास्टिकच्या कंदिलांवर बंदी आणण्यात आली. दिवाळीच्या काही दिवस आधीपासूनच बाजार फुललेले दिसतात. दिवाळीच्या प्रत्येक दिवसासाठी लागणारं साहित्य बाजारात दिसतं. दुकानदारांनी ते मागवलं असलं तरी पावसामुळं म्हणावी तशी गर्दी बाजारात दिसत नाही आहे.



हेही वाचा -

‘इन्स्टाग्राम’वर तरुणीला धमकावणे पडले महागात

शिवसेनेचे 'हे' उमेदवार केवळ ४०९ मतांनी विजयी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा