Advertisement

शिवसेनेचे 'हे' उमेदवार केवळ ४०९ मतांनी विजयी


शिवसेनेचे 'हे' उमेदवार केवळ ४०९ मतांनी विजयी
SHARES

विधानसभा निवडणुकीतच्या मतमोजणीवेळी अनेक मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. अनेक मतदारासंघात शिवेसेना-भाजप युतीच्या उमेदवारांनी बाजी मारली. परंतु, चांदिवली मतदारसंघातील काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये झालेल्या लढतीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे आणि काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांच्यात  झालेल्या अटीतटीच्या लढतीत लांडे यांना फक्त ४०९ मतांनी विजय मिळाला.


शिवसेनेच्या दिलीप लांडे यांना ८५ हजार ८७९ आणि खान यांना ८५ हजार ४७० मते मिळाली आहेत. तसंच, अंधेरी पूर्व मतदारसंघातील शिवसेनेचे रमेश लटके सन २०१४ च्या निवडणुकीत ५४७९ मतांनी जिंकले होते. यंदाच्या निवडणुकीत १६ हजार ९९५ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे माजी नगरसेवक व अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांचा पराभव केला.

लटके यांना ६२ हजार ७७३ आणि पटेल ४५ हजार ८०८ मते मिळाली. काँग्रेसचे अमिन कुट्टी यांना २७ हजार ९५१ मतांवर समाधान मानावं लागलं.हेही वाचा -

Maharashtra Assembly Elections 2019: मुंबईत 'इतकी' नोटा मतं

राज्यात स्पष्ट बहुमतासह पुन्हा महायुतीचसंबंधित विषय
Advertisement