maharashtra assembly elections 2019: मुंबईत 'इतकी' नोटा मतं


maharashtra assembly elections 2019: मुंबईत 'इतकी' नोटा मतं
SHARES

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात २१ ऑक्टोबरला मतदान झालं असून, गुरूवारी २४ ऑक्टोबर रोजी या मतदानाची मोजणी झाली. त्यावेळी अनेक मतदारांनी नोटाला म्हणजेच यापैकी 'एकही उमेदवार आम्हास नको' या पर्यायाचा वापर केला आहे. मुंबईत एकूण १ लाख ३८ हजार २७७ मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर केला आहे. मुंबईतील १० व उपनगरातील २६ अशा एकूण ३६ मतदारसंघांत मिळून एकूण ४९ लाख २४ हजार ९४८ मते ३३१ उमेदवारांना पडली. त्यातील १ लाख ३८ हजार २७७ 'नोटा' मते असल्यानं या मतांची टक्केवारी २ लाख ८० हजार इतकी आहे.

'नोटा'चा वापर

जोगेश्वरी पूर्वमध्ये १२०३१ तर बोरिवलीत १००९५ मतदारांनी 'नोटा'चा वापर केला. याखेरीज बहुचर्चित वरळी मतदारसंघातही ६३०५ मतदारांनी उमेदवारांना नाकारले. तसंच, शिवडी, दहिसर, मागाठाणे, चारकोप, गोरेगाव, अंधेरी पूर्व, विलेपार्ले व कुर्ला येथील 'नोटा' मतांचा आकडा ४ हजारांच्यावर आहे.

मुलुंडमध्ये नोटा मते ५२०० इतकी आहे. जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील 'नोटा' मते सर्वाधिक ८.०८ व बोरिवलीतील ६.०८ टक्के इतकी आहेत. वरळीतील 'नोटा' मतांची टक्केवारी ४.८८ आहे. बहुतांश मतदारसंघातील 'नोटा' मतांची टक्केवारी २.५० ते ३.६० दरम्यान आहे.हेही वाचा -

माहीममधून सदा सरवणकर १८ हजार मतांनी विजयी

राज्यात स्पष्ट बहुमतासह पुन्हा महायुतीचसंबंधित विषय