Advertisement

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना अनोखी सवलत


मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना अनोखी सवलत
SHARES

मंत्रालय आणि त्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना महिन्यात २ वेळा कमाल दीड तास कार्यालयात उशिरा येण्याची सवलत देण्यात आली आहे. तसंच, रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यास किंवा कर्मचाऱ्याच्या हाती नसलेल्या कारणांमुळे कार्यालयात येण्यास विलंब झाल्यास त्यासाठी कर्मचाऱ्याची रजा कापली जाणार नाही, मात्र खातेप्रमुखांनी त्या कारणांची खातरजमा करणे आवश्यक आहे.

सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी यासंदर्भात शासननिर्णय जारी केला आहे. मंत्रालय आणि क्षेत्रीय कार्यालयांसाठी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० अशी कार्यालयीन वेळ आहे.

त्यानुसार सकाळी कमाल दीड तास विलंबाने येण्याची सवलत महिन्यात दोन वेळा मिळेल. नंतर तिसऱ्या विलंबासाठी एक नैमित्तिक रजा कापली जाईल. ती शिल्लक नसल्यास अर्जित रजा कापली जाईल. मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत एक तास लवचीकता कालावधी आहे. त्यानुसार सकाळी विलंबाने आल्यास तो कालावधी सायंकाळी उशिरा थांबून भरून काढता येतो.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा