कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील लॉकडाऊनह आता शिथिल करण्यात आला आहे. येथील सर्व दिवस दुकानं उघडण्यास महापालिकेनं परवानगी दिली आहे.
आतापर्यंत शहरातील दुकाने एकदिवसाआड उघडली जात होती. सम विषम तारखा लक्षात घेऊन रस्त्याच्या एकाच बाजूची दुकानं एका दिवशी उघडी ठेवायला मुभा होती. आता मात्र हा नियम रद्द करण्यात आला आहे. रस्त्याच्या दुतर्फा असणारी दुकानं दररोज उघडण्याची मुभा देण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली परिसरात जुलै अखेरपर्यंत कडक लॉकडाऊन होता. येथे अजूनही रुग्णवाढ होत आहे. मात्र,वेग थोडा मंदावला आहे. ऑगस्टमध्ये हळूहळू व्यवहार पूर्ववत व्हायला सुरुवात झाली. आता लॉकडाऊन आणखी शिथिल करण्यात आला.
माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शहरातील दुकाने पूर्णतः सुरू करण्यासंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार करून मागणी केली होती. गेले सहा महिने आर्थिक संकट सहन करून अजूनही बाजरपेठा सुरळीत होऊ शकलेल्या नव्हत्या.
दुकान कितीही दिवस सुरू राहिले तरी कामगार आणि इतर घटकांना पूर्ण पगार देण्याची आवश्यकता असते. अशा सर्व घटकांचा आणि अडचणींचा विचार करता शहरातील सर्व लॉकडाऊन खुले करून सर्व दुकाने पूर्णतः खुली करण्याची गरज असल्याचे मत माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी पत्राद्वारे मागणी केली होती. त्यावर निर्णय होत कोरोना प्रतिबंधात्मक अटी आणि शर्थीसह दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
हेही वाचा -
हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंविरोधात पुरावे द्या, राऊतांचं भाजपला आव्हान
मग, संजय राऊत बोलत असल्यानेच संशय वाढलाय- नारायण राणे