Advertisement

मेट्रो-3 चा वाद पुन्हा न्यायालयाच्या दारात


मेट्रो-3 चा वाद पुन्हा न्यायालयाच्या दारात
SHARES

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)कडून मनमानी होत असल्याचे म्हणत वरळीतील रहिवाशी कुणाल बिरवाडकर यांनी बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाने मेट्रो-3 मधील झाडांच्या कत्तलीला हिरवा कंदील दिल्याने आता न्यायालयातील वाद संपुष्टात आला असे वाटत असतानाच पुन्हा हा वाद न्यायालयाच्या दारात गेला आहे. त्यानुसार शुक्रवारी 26 मे रोजी यावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती कुणाल बिरवाडकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

कफ परेड, ओव्हल मैदान, चर्चगेट, वरळी, सिद्धिविनायक अशा अनेक ठिकाणी एमएमआरसीकडून झाडांची कत्तल जोरात सुरू आहे. उच्च न्यायालयाने तसेच सर्वोच्च न्यायालयाने झाडांच्या कत्तलीवरील स्थगिती उठवली असली तरी उच्च न्यायालयाकडून स्थापन करण्यात येणाऱ्या समितीच्या माध्यमातून झाडांच्या कत्तलीसह इतर मुद्दे हाताळले जावेत, असेही आदेश दिले आहेत. असे असताना ही समिती स्थापन होण्याआधीच झाडांची कत्तल करत एमएमआरसी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप करत बिरवडकर यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचवेळी झाडांच्या कत्तलीला न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला असला तरी झाडांच्या कत्तलीसाठी ज्या काही इतर परवानग्या हव्या असतात त्या परवानग्या न घेताच ही कत्तल केली जात असल्याचा आरोपही बिरवाडकर यांच्यासह 'सेव्ह ट्री'कडून केला जात आहे.


हेही वाचा

मेट्रो-३ साठी झाडांची कत्तल सुरु; पर्यावरणवादी पुन्हा आक्रमक

आरेतील 100 हून अधिक झाडांची एमएमआरसीकडून बेकायदा कत्तल


वरळीमध्ये ज्या झाडांचे पुनर्रोपन केले जाणार आहे, ती झाडेही कापली जात असल्यानेच या विषयाच्या खोलात गेले असता एमएमआरसीचा मनमानी कारभार समोर आल्याचेही बिरवाडकर यांनी स्पष्ट केले आहे. आता शुक्रवारी यावरील सुनावणी होणार असल्याने सेव्ह ट्रीसह सर्वांचेच लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.

'मुबंई लाइव्ह'च्या दणक्यानंतर रात्रीस खेळ चालेचा प्रयोग बंद - 

पर्यावरणप्रेमींचा धसका घेत एमएमआरसीने मागील दोन दिवसांपासून रात्री उशीरा 2-3 वाजल्यानंतर झाडांच्या कत्तलीचे काम करण्याचा धडाका लावला होता. यासंबंधीचे सविस्तर वृत्त मंगळवारी 'मुंबई लाइव्ह'ने 'एमएमआरसीचा रात्रीस खेळ चाले' या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. हे वृत प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र एमएमआरसीने ही कारवाई बंद केल्याची माहिती 'सेव्ह ट्री'च्या सदस्या तसनीम शेख यांनी दिली आहे. मंगळवारी रात्री झाडे कापण्याचे काम कुठेही झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा