Advertisement

पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरूच, मुंबईत पेट्रोल विक्रमी पातळीवर

यापूर्वीच मुंबईत प्रीमियम पेट्रोल शंभर रुपयांवर गेले आहे. आता साधे पेट्रोल १०० रुपये होण्यासाठी ६ पैसेच कमी आहेत.

पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरूच, मुंबईत पेट्रोल विक्रमी पातळीवर
(Representational Image)
SHARES

देशात पेट्रोल (petrol) आणि डिझेल (diesel) ची दरवाढ सुरूच आहे. गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलची भाव वाढ केली आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव १०० रुपये होण्यासाठी आता अवघे ६ पैसेच कमी आहेत.  

पेट्रोल २४ पैसे आणि डिझेल २९ पैशांनी महागलं आहे. या भाववाढीने मुंबईत पेट्रोलचा भाव विक्रमी ९९.९४ रुपयांवर गेला. तर लीटर डिझेलचा भाव ९१.८७ रुपये झाला आहे. यापूर्वीच मुंबईत प्रीमियम पेट्रोल शंभर रुपयांवर गेले आहे. आता साधे पेट्रोल १०० रुपये होण्यासाठी ६ पैसेच कमी आहेत. उद्या किंवा परवामध्ये पेट्रोल १०० रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. 

दिल्लीत पेट्रोलचा भाव ९३.६८ रुपयांवर गेला आहे. तर चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.२८ रुपये तर कोलकात्यात ९३.७२ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८४.६१ रुपये आहे, चेन्नईत ८९.३९ रुपये तर कोलकात्यात डिझेल ८७.४६ रुपये प्रती लीटर झाले आहे.

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. एका महिन्यात आतापर्यंत दरवाढ होण्याची ही तेरावी वेळ आहे.

देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवे दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात.

या वर्षात ३१ वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. तर ४ वेळा किंमती कमी झाल्या आहेत. जानेवारीत १० वेळा आणि फेब्रुवारीमध्ये १६ वेळा पेट्रोल, डिझेल महागलं आहे. तर मार्चमध्ये ३ वेळा आणि एप्रिलमध्ये १ वेळा किमती कमी झाल्या आहेत.



हेही वाचा -

वृक्ष छाटणीची परवानगी अॅपवरून मिळणार, महापालिकेचा मोठा निर्णय

  1. १५ जूनपर्यंत मासेमारीला परवानगी देण्याची मच्छिमारांची मागणी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा