Advertisement

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ
SHARES

मुंबईसह देशभरात पेट्रोलच्या किंमती प्रचंढ वाढत आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. मंगळवारी मुंबईत पेट्रोल ५ पैसे आणि डिझेल १२ पैशांनी महागले आहे. काही दिवसांपूर्वी ८०.८७ असलेला पेट्रोलचा दर आता पेट्रोलचा दर प्रति लीटर ८१ रुपये ३३ पैसे झाला आहे. तर डिझेल ७१.४३ रुपये असलेला दर आता प्रति लीटर ७२ रुपये १४ पैसे झालं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळं वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

आयातीचा खर्च

जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यानं पेट्रोलियम कंपन्यांचा तेल आयातीचा खर्च वाढणार आहे. जागतिक बाजारात खनिज तेलाचा भावात घसरण झाली आहे. मंगळवारी खनिज तेलाचा भाव ६८.९१ डॉलरपर्यंत खाली आला आहे.

उच्चांक गाठला

दिल्लीत पेट्रोल आणि डिझेल दरानं १३ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल दरात सोमवारी दरात १५ पैशांची तर डिझेलमध्ये १७ पैशांची वाढ केली होती. तसंच, मंगळवारी दिल्लीत पेट्रोलचा दर ७५.७४ रुपये आणि डिझेल ६८.७९ रुपये आहे.

दरांत वाढ

मुंबईत पेट्रोल ५ पैसे आणि डिझेल १२ पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लीटर ८१ रुपये ३३ पैसे झाला आहे. डिझेल दर प्रति लीटर ७२ रुपये १४ पैसे झालं आहे. चेन्नईत पेट्रोल दर ७८.६९ रुपये झाले आहे.डिझेलचा दर ७२.६९ रुपये असून त्यात सोमवारच्या तुलनेत ११ पैशांची वाढ झाली. कोलकात्यात पेट्रोल ७८.३३ रुपये आणि डिझेल ७१.१५ रुपये आहे.


हेही वाचा -

तेजस एक्स्प्रेसमध्ये खवय्यांची चंगळ, नास्ता व जेवणात विशेष मेन्यू

मुंब्रात ७ गोडाऊनला भीषण आग



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा