Advertisement

पेट्रोल-डिझेलच्या दरांत पुन्हा वाढ


पेट्रोल-डिझेलच्या दरांत पुन्हा वाढ
SHARES

शनिवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांत पुन्हा एकदा वाढ झाली. मुंबईत पेट्रोलच्या दरांत १८ पैसे तर डिझेलच्या दरांत ३१ पैशांची वाढ झाली आहे. यामुळे मुंबईत पेट्रोल ८८.१२ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ७८.८२ रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.


सवलतीचा फायदा नाही

४ आॅक्टोबर रोजी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेवरील एक्साइज ड्युटी दीड रुपयांनी कमी केली होती. तर तेल कंपन्यांनी इंधनावर १ रुपयाची कपात केली होती. अशा तऱ्हेने एकूण अडीच रुपयांची कपात पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये करण्यात आली होती. परंतु इंधनाच्या किंमती सातत्याने वाढतच असल्याने या सवलतीचा ग्राहकांना कुठलाही फायदा पोहोचू शकलेला नाही.


किंमती ठरवण्याचं स्वातंत्र्य

यासंदर्भात गुरूवारी अर्थ मंत्रालयाने सांगितलं होतं की, कुठल्याही परिस्थितीत तेल उत्पादक कंपन्यांना पेट्रोल-डिझेलचे दर घटवण्यास सांगितलं जाणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढ-उतारानुसार इंधनाचे दर ठरवण्यास त्यांना मुभा असेल. कारण तेल कंपन्यांना डाॅलर खर्चून आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्चं तेल खरेदी करावं लागतं. त्यानुसार रुपयाच्या मूल्यानुसार भारतीय बाजारपेठेतील इंधनाच्या किंमती ठरवण्यात येतात.


शुक्रवारी मोदींनी घेतली बैठक

पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी अर्थमंत्री अरूण जेटली आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत भारतीय बाजारपेठेतील इंधनाच्या दरांसंदर्भात चर्चा करण्यात आली. सोबतच देशांतर्गत कच्च्या तेलाचं उत्पादन वाढवण्यासाठी तसंच चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी आॅइल मार्केटींग कंपन्यांना तेलाची आयात कमी कशी करता येईल, यासंबंधी निर्देश देण्यावरही चर्चा झाली.



हेही वाचा-

फक्त एक दिवसाचाच दिलासा, पेट्रोल पुन्हा महागलं

डिजिटल पेमेंटचे ५ फायदे ! नक्की वाचा...



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा