Advertisement

फक्त एक दिवसाचाच दिलासा, पेट्रोल पुन्हा महागलं

मुंबईत पेट्रोलच्या दरात 18 पैशांची वाढ झाली असून डिझेलच्या दरात 70 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलसाठी आता 87.15 पैसे मोजावे लागतील. तर प्रतिलिटर डिझेलसाठी 76.75 पैसे मोजावे लागणार आहेत.

फक्त एक दिवसाचाच दिलासा, पेट्रोल पुन्हा महागलं
SHARES

केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त करत नागरिंकांना दिलासा दिला असला तरी दरवाढ काही थांबताना दिसत नाही. फक्त एक दिवसांच्या दिलासानंतर शनिवारी पेट्रोल पुन्हा महागलं.

मुंबईत पेट्रोलच्या दरात 18 पैशांची वाढ झाली असून डिझेलच्या दरात 70 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलसाठी आता 87.15 पैसे मोजावे लागतील. तर प्रतिलिटर डिझेलसाठी 76.75 पैसे मोजावे लागणार आहेत.

म्हणून डिझेल स्वस्त

केंद्र आणि राज्य सरकारने गुरुवारी पेट्रोलच्या करात प्रत्येकी अडीच रुपयांनी कपात केली होती. त्यामुळे पेट्रोलचा दर राज्यात पाच रुपयांनी घटला होता. आता राज्य सरकारने डिझेलवर करकपात केल्यामुळे डिझेलही स्वस्त झाले आहे.

केंद्र सरकारने डिझेलच्या दरात लिटरमागे अडिच रुपयांची कपात केल्यानंतर आता राज्य सरकारने यामध्ये 1 रुपयाची कपात आणि 56 पैसे कर कपातीचा निर्णय घेतला. त्यामुळे डिझेल 1.56 पै रुपये प्रति लिटर स्वस्त करण्यात आलं. त्यामुळे राज्यात डिझेल 4.06 रुपये प्रति लिटर स्वस्त झालं आहे.

दरवाढ थांबता थांबेना

आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्चा तेलाचे दर वाढत आहेत. शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरणा यामुळे इंधनाच्या किंमती रोज वाढताना दिसत आहेत. त्याचाच परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होत आहे.

हेही वाचा -

पेट्रोलपाठोपाठ राज्यात डिझेल ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा