Advertisement

पेट्रोलपाठोपाठ राज्यात डिझेल ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त!

ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन डिझेलच्या दरांत दीड रुपयांची घट करण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने डिझेलच्या करांमध्ये प्रति लिटर १ रुपया ५६ पैशांची कपात केली.

पेट्रोलपाठोपाठ राज्यात डिझेल ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त!
SHARES

पेट्रोलपाठोपाठ राज्यात डिझेल देखील प्रति लिटर ४ रुपयांनी स्वस्त होणार आहे. राज्य सरकारने डिझेलवरील कपात केली असून यासंदर्भातील अधिकृत घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सायंकाळी केली.


केंद्र, राज्य सरकारचा दिलासा

केंद्र सरकारने गुरूवारी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात प्रति लिटर दीड रुपयांनी कपात केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांना इंधन दरांत प्रति लिटर १ रुपयांनी घट करण्यास सांगितलं होतं. सोबतच राज्य सरकारांना देखील इंधन दरांवरील मूल्यवर्धीत कर अर्थात व्हॅटमध्ये कपात करण्याचं आवाहन केलं होतं.



आधी केवळ पेट्रोलची दरकपात

त्यानुसार राज्य सरकारने केवळ पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर अडीच रुपये व्हॅट दरकपातीचा निर्णय घेत डिझेलच्या करांत कुठलीही कपात केली नव्हती. त्यामुळे केंद्र सरकार आणि तेल कंपन्या यांचे अडीच रुपये आणि राज्य सरकारचे अडीच रुपये मिळून पेट्रोलच्या दरांत एकूण ५ रुपयांची घट झाली होती. तर डिझेलच्या दरांत केवळ अडीच रुपयांची घट झाली होती.


एकूण ४ रुपये ६ पैशांची कपात

पण ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन डिझेलच्या दरांत दीड रुपयांची घट करण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने डिझेलच्या करांमध्ये प्रति लिटर १ रुपया ५६ पैशांची कपात केली. त्यामुळे महाराष्ट्रात डिझेलच्या दरांत एकूण ४ रुपये ६ पैशांची कपात झाली आहे. हे नवीन दर शुक्रवार मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.



हेही वाचा-

राज्यात डिझेलही ४ रुपयांनी स्वस्त होणार- मुख्यमंत्री

८ रुपयांच्या इंधनदरवाढीवर ५ रुपयांचा उतारा, नवीन दर अाज रात्रीपासून लागू



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा