Advertisement

८ रुपयांच्या इंधनदरवाढीवर ५ रुपयांचा उतारा, नवीन दर अाज रात्रीपासून लागू

केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटच्या दरांत अडीच रुपयांनी घट करण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी स्वस्त हाेणार आहे. गेल्या २ महिन्यांत इंधनाच्या दरांत प्रति लिटर साडेसात रुपयांहून अधिक वाढ झाल्यानंतर सरकारने ५ रुपयांची सवलत जनतेला देऊ केली आहे.

८ रुपयांच्या इंधनदरवाढीवर ५ रुपयांचा उतारा, नवीन दर अाज रात्रीपासून लागू
SHARES

केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटच्या दरांत अडीच रुपयांनी घट करण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त हाेणार आहे. गेल्या २ महिन्यांत इंधनाच्या दरांत प्रति लिटर साडेसात रुपयांहून अधिक वाढ झाल्यानंतर सरकारने ५ रुपयांची सवलत जनतेला देऊ केली आहे. राज्यातील नागरिकांसाठी हा थोडाफार का होईना पण दिलासाच म्हणावा लागेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घटत असताना देखील देशांतर्गत तेल कंपन्या इंधनाच्या दरांत वाढ करत असल्याने सर्वसामान्य चांगलेच संतापले हाेते. हा संताप सरकारच्या निर्णयामुळे थोड्याफार प्रमाणात निवळू शकेल. 


सर्वसामान्य हैराण

मागील काही दिवसांपासून पेट्रोल अणि डिझेलच्या वाढत्या किंमतीने सर्वसामान्य हैराण झालेले असताना केंद्र सरकारकडून कुठलाही दिलासा मिळत नसल्याने सरकारवर चोहोबाजूंनी टीका करण्यात येत होती. खासकरून आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमती वाढत असल्याने आम्ही काहीच करू शकत नसल्याची प्रतिक्रिया केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिल्याने तर या टीकेत भरच पडली होती.  


किती रुपयांनी वाढले दर?

१ आॅगस्ट २०१८ रोजी मुंबईत प्रति लिटर पेट्रोलचे दर ८३.७६ रुपये तर डिझेलचे दर प्रति लिटर ७२.०० रुपये एवढे होते. १ सप्टेंबरला हेच पेट्रोलचे दर ८६.०९ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर प्रति लिटर ७४.७६ रुपयांवर जाऊन पोहोचले. २४ सप्टेंबर रोजी नव्वदी पार केल्यानंतर ४ आॅक्टोबर रोजी पेट्रोलचे दर ९१.३४ रुपयांवर आणि डिझेलचे दर ८०.१० रुपयांवर आले होते. म्हणजेच अवघ्या २ महिन्यांमध्ये पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर ७.५८ रुपयांची वाढ झाली, तर डिझेलच्या दरांत प्रति लिटर ८.०१ रुपयांची वाढ झाली. त्यातुलनेत सरकारने केवळ ५ रुपयांचाच दिलासा जनतेला दिला आहे.   



उत्पादन शुल्क घटवले

अखेर जनतेच्या टीकेनंतर नमतं घेत गुरूवारी दुपारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी इंधनावरील उत्पादन शुल्कात १.५० रुपयांची घट करण्याची घोषणा केली. सोबतच पेट्रोलियम कंपन्यांना १ रुपयांची तसंच राज्य सरकार यांना इंधनावरील व्हॅटमध्ये अडीच रुपयांची घट करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. या आवाहनाला प्रतिसाद देत पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरांत त्वरीत एक रुपयांची कपात केल्याने पेट्रोल-डिझेलमध्ये अडीच रुपयांची घट झाली. या सवलतीमुळे सरकारचा १०, ५०० कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे.



व्हॅटमध्येही अडीच रुपयांची कपात

यानंतर जेटली यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील इंधनावरील व्हॅटमध्ये अडीच रुपयांची घट करण्याची घोषणा केली. यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल एकूण ५ रुपयांनी स्वस्त होणार आहे. हे नवे दर गुरूवारी मध्यरात्रीपासून लागू होतील.  



हेही वाचा-

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा