Advertisement

मुंबईत ९ महिन्यांनंतर घटल्या पेट्रोलच्या किंमती


मुंबईत ९ महिन्यांनंतर घटल्या पेट्रोलच्या किंमती
SHARES

मुंबईत तब्बल ९ महिन्यांनी पेट्रोलची किंमत ८० रुपये प्रति लिटरच्या खाली आहे. मंगळवारी पेट्रोलच्या किंमतीत ४० ते ४४ पैशांची घट झाल्याने मुंबईत पेट्रोल ७९.६२ रुपये प्रति लिटरवर आलं आहे.

इंडियन आॅइल काॅर्पोरेशन (IOC) च्या संकेतस्थळावर नोंदवण्यात आलेल्या किंमतीनुसार सोमवारी मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८०.०३ रुपये इतके होते. त्यात ४१ पैशांची घट झाल्याने मंगळवारी पेट्रोलचे दर प्रति लिटर ७९.६२ वर आले.

यापूर्वी ३ मार्च रोजी पेट्रोलचे दर ७९.८७ रुपये प्रति लिटर होते. ४ मार्च रोजी त्यात होऊन पेट्रोलचे दर प्रति लिटर ८०.१३ रुपयांवर पोहोचले. तेव्हापासून पुढील ९ महिने पेट्रोलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत होती.

मंगळवारी डिझेलच्या दरांमध्येही घट होऊन डिझेल प्रति लिटर ७२.१३ रुपयांवर जाऊन पोहोचलं आहे. मागच्या ४ महिन्यांतील डिझेलच्या दरांतील ही निच्चांकी पातळी आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा