10 मे पासून प्रत्येक रविवारी पेट्रोलपंप राहाणार बंद

 Mumbai
10 मे पासून प्रत्येक रविवारी पेट्रोलपंप राहाणार बंद

देशभरातील पेट्रोल पंप मे महिन्यापासून आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. म्हणजेच पेट्रोलपंप देखील आता साप्ताहिक सुट्टी घेणार आहेत. पेट्रोल पंप असोसिएशनने 10 मे पासून हा निर्णय अंमलात आणण्याचे ठरवले असल्याची माहिती मुंबई पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष रवी शिंदे यांनी दिली आहे. पेट्रोल पंपधारकांची वाढीव कमिशनची मागणी आहे. ही मागणी पूर्ण झाली नाही, तर मात्र साप्ताहिक सुट्टी घेण्याचा इशारा पेट्रोल पंपधारकांनी दिला आहे. याला दोन बाजू आहेत. एक म्हणजे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना एक दिवस साप्ताहिक सुट्टी मिळेल, तर दुसरीकडे प्रत्येक पंपावर वीजेची बचत होईल. तसेच एक दिवस इंधनाचा वापर झाला नाही, तर लाखो लिटर इंधन बचत देखील होईल. त्यामुळे पपं चालकांना मात्र कमिशन वाढीसोबत यात देशहित दिसत आहे. देशभरात 56 हजार पेट्रोल पंप  आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 4 हजार 700 तर मुंबईत 223 पेट्रोलपंप आहेत.

Loading Comments