Advertisement

'फ्लोरा फाऊंटन' पुन्हा एकदा नव्या रुपात

ब्रिटिशांनी १८६४ मध्ये फ्लोरा फाऊंटन उभारले होते. पण कालांतरानं या वास्तूकडे दुर्लक्ष झालं. पण पुन्हा एकदा ही वास्तू नव्यानं उभारण्यात आली आहे असून २४ जानेवारीला याचं लोकार्पण होणार आहे.

'फ्लोरा फाऊंटन' पुन्हा एकदा नव्या रुपात
SHARES

देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण स्थान बनलेल्या मुंबईतल्या 'फ्लोरा फाऊंटन'च्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. फ्लोरा फाऊंटनवर अखेरचा हात फिरवण्यात येत आहे. २४ जानेवारीला लोकार्पण झाल्यानंतर फ्लोरा फाऊंटनची कारंजी पुन्हा एकदा पर्यटकांना पाहता येणार आहे.

पुरातन वास्तू जपण्याचा प्रयत्न

२०१६ मध्ये फ्लोरा फाऊंटनच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. दोन टप्प्यांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात वास्तूच्या आसपासच्या परिसराचे सुशोभीकरण आणि दुसऱ्या टप्प्यात फ्लोरा फाऊंटनची दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्याचं ठरवण्यात आलं. पहिल्या टप्प्टातील कामासाठी कंत्राटदाराची निवड केली.

दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अॅण्ड कल्चरल हेरिटेजची नियुक्ती केली. दुसऱ्या टप्प्यातील दुरुस्ती आणि नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून यावर अखेरचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे. २४ जानेवारीला सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या वास्तूचे लोकार्पण होणार आहे.

असे होते जुने फ्लोरा फाऊंटन

ब्रिटिशांनी १८६४ मध्ये फ्लोरा फाऊंटन उभारले होते. वास्तुविशारद नरिमन शॉ यांनी तयार केलेल्या आराखड्यानुसार पोर्ट लॅण्ड दगडापासून फ्लोरा फाऊंटन उभारण्यात आले. कारंजी आणि त्यावरील भागात रोमन देवता असे त्याचे स्वरूप होते. यासोबतच कारंजीच्या चारही बाजूला भारतीय उद्योगधंदे, झाडे, फळे, धान्य यांच्या प्रतिकृतीसह युवतींच्या पुतळ्याचा समावेश होता. पण कालांतरानं या वास्तूकडे दुर्लक्ष होत गेले. हळूहळू त्यावर शेवाळे साचू लागले. वास्तूची अक्षरश: दुरावस्ता झाली. मध्यंतरी यातील कारंजी देखील बंद पडली. अखेर पालिकेनं याचं नुतनीकरण करण्याचा निर्णय घेतला.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा