दादरच्या 'या' १०० वर्ष जुन्या ब्रिजचं कोसळलं प्लास्टर


SHARE

मुंबईतील दादर येथील टिळक उड्डाणपुलाचा भाग कोसळ्याची माहिती समोर येत आहे. टिळक उड्डाणपुल हा धोकादायक पुलांच्या यादीत असून, हिंदू कॉलनीजवळचा प्लास्टरचा भाग कोसळला. बुधवारी दुपारच्या सुमाराल ही घटना घडली. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. या पुलाची पुढील ४ दिवसांत दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पूल विभागानं स्पष्ट दिली.

१०० वर्षे जुना

टिळक उड्डाणपुल हा १०० वर्षे जुना पूल आहे. दादर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा पूल मुंबईतील महत्त्वाच्या पुलांपैकी एक आहे. हा पूल धोकादायक स्थितीत असून पालिकेनं दुरुस्तीसाठी कंत्राटदार निश्चित केला आहे. मात्र, दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेच्या 'ना हरकत प्रमाणपत्रा'ची गरज आहे. रेल्वेच्या 'एनओसी'नंतरच पुलाची दुरुस्ती शक्य होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

धोकादायक पूल

दररोज हजारो वाहनांची व पादचाऱ्यांची ये-जा या पुलावरून होत असते. पूल धोकादायक झाला असून या पुलाची तातडंने दुरुस्ती करावी अथवा पाडून नव्याने बांधावा, अशी मागणी यापूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अनेक वेळा केली. प्लास्टर कोसळल्यानं काही वेळासाठी पुलावरून जाणारी वाहतूक बंद केली होती. तसंच चार दिवसांत दुरुस्ती करण्यात येणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या