सरकारी उदासिनतेचा स्कायवॉक

धारावी - माहिम स्थानकाला थेट टी जंक्शनला जोडणार रस्ता. माहिम स्थानकावरून धारावीत जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठीचा एकमेव रस्ता. दररोज हजारो पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतोय. म्हणूनच पादचाऱ्यांच्या सोईसाठी स्कायवॉक माहिम स्थानकातून थेट टी जंक्शनला जोडण्याचा निर्णय झाला. पण गेली अनेक वर्ष या स्कायवॉकचं कामकाज अर्धवटच आहे. या स्कायवॉकचं काम कधी पूर्ण होईल हे सांगता येणं कठिणच आहे. पण सरकारी उदासिनतेचा फटका पादचाऱ्यांना बसतोय हे मात्र नक्की.

Loading Comments