Advertisement

PMC खातेदारांसाठी खूशखबर, पैसे काढण्याची मर्यादा 'इतकी' वाढवली

पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. रिझर्व्ह बँकेने पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे.

PMC खातेदारांसाठी खूशखबर, पैसे काढण्याची मर्यादा 'इतकी' वाढवली
SHARES
Advertisement

पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. खातेदारांना आता ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम बँकेतून काढता येणार आहे. रिझर्व्ह बँकेने पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे.

पीएमसी बँकेच्या खातेदारांना आधी ४० हजार रुपये काढता येत होते. आता या ४० हजारांव्यतिरिक्त आणखी ५० हजार रुपये काढता येणार आहेत. मात्र खातेदारांना हे ५० हजार रुपये शिक्षण किंवा वैद्यकीय उपचारांसाठीच काढता येणार आहेत. यासाठी बँकेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता खातेदारांना करावी लागणार आहे.

पीएमसी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बँकेने बँकेवर अनेक निर्बंध घातले होते. यामध्ये खातेदारांना पैसे काढण्यावरही निर्बंध होते. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे तणाव आलेल्या संजय गुलाटी (५१) आणि फत्तेमुल पंजाबी (५९) या दोन खातेदारांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. तर एका खातेदाराने आत्महत्या केली होती. ओशिवरा येथे राहणाऱ्या गुलाटी यांच्या खात्यात जवळपास ९० लाख तर मुलुंडमधील फत्तेमुल पंजाबी यांच्या खात्यात १० लाखांहून अधिक रक्कम जमा होती. हेही वाचा  -

PMC बँक घोटाळा : रिझर्व्ह बँक ३० ऑक्टोबरला निर्णय जाहीर करणार
संबंधित विषय
Advertisement