Advertisement

डीजे मार्टिन गॅरिक्सच्या कार्यक्रमाच्या अायोजकांवर गुन्हा, ध्वनी मर्यादेचं उल्लंघन


डीजे मार्टिन गॅरिक्सच्या कार्यक्रमाच्या अायोजकांवर गुन्हा, ध्वनी मर्यादेचं उल्लंघन
SHARES

मुंबईत झालेल्या डीजे मार्टिन गॅरिक्सच्या कार्यक्रमाच्या अायोजकांवर ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. शनिवारी महालक्ष्मी रेसकोर्सवर डीजे मार्टिन गॅरिक्सचा कार्यक्रम अायोजित करण्यात अाला होता. यावेळी पोलिसांना कार्यक्रम स्थळाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर ८० ते ९९ डेसिबल दरम्यान अावाज असल्याचं अाढळून अालं. 


नागरिकांच्या तक्रारी

 डच डीजे मार्टिन गॅरिक्सचा कार्यक्रम मागील शनिवारी महालक्ष्मी रेसकोर्सवर रेडियो मिर्ची अाणि  मनोरंजन कंपनी बॉस इंडियाने अायोजित केला होता. डीजेच्या दणदणाटाने अावाजाची मर्यादा ओलांडल्याने अासपासच्या नागरिकांना याचा त्रास होऊ लागला. अनेक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या. त्यानंतर ताडदेव पोलिसांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व प्रवेशद्वारांवर अावाजाची तपासणी केली. पोलिसांना अावाज मर्यादेपेक्षा अधिक असल्याचं अाढळून अालं. 


६० डेसिबलपेक्षा अधिक 

पोलिसांनी १०.३० ते ११.०७ वाजेच्या दरम्यान अावाज मर्यादा तपासली. यावेळी अावाज मर्यादेपेक्षा म्हणजे ६० डेसिबलपेक्षा अधिक असल्याचे अाढळून अाले. पोलिसांनी या प्रकरणी कार्यक्रमाच्या अायोजकांना गुन्हा दाखल केला. अाहे. पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करत अाहेत. हेही वाचा - 

महापालिकेचे हात वर, खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई नाही
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा