Advertisement

महापालिकेचे हात वर, खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई नाही


महापालिकेचे हात वर, खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई नाही
SHARES

रस्त्यांवरील खड्ड्यांत पडून किंवा खड्ड्यांमध्ये वाहन आदळून अपघाती मृत्यू होण्याच्या घटना थांबत नसताना महापालिकेने याप्रकरणी चक्क आपली जबाबदारी झटकून टाकली आहे. अशा दुर्घटनांमध्ये अनेकांनी आपल्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला गमावल्याने त्यांच्या जगण्याचा आधारवडच हरवून बसला आहे. तरीही अशा घटनांमध्ये मृत्यू वा जखमी झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यास प्रशासन बांधील नसल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे.


महापालिकेचा अभिप्राय

मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे, गटार, मॅनहोलमध्ये पडून जखमी होण्याच्या किंवा मृत्यू होण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. अशा दुर्घटनांमध्ये एखादी व्यक्ती जखमी झाल्यास किंवा संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी महापालिकेने धोरण तयार करावं, यासंदर्भातील शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा ठराव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता. या ठरावावर प्रशासनाचा अभिप्राय मागवण्यात आला होता. मात्र या अभिप्रायात महापालिकेने नुकसान भरपाई देण्यास नकार दिला आहे.


काय म्हणाली महापालिका?

महापालिका बहुतांश विकासकामे कंत्राटदाराच्या माध्यमातून करवून घेते. या विकासकामांच्या देखभालाची जबाबदारीही कंत्राटदारांवरच असते. त्यामुळे एखाद्या ठिकाणी नुकसान झाल्यास किंवा अपघात घडल्यास कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यास प्रशासन बांधील नाही. तसंच त्याबाबत कायदेशीर धोरण अवलंबणंही शक्य नसल्याचं सांगत महापालिकेने हात झटकले आहेत.



हेही वाचा-

शिवडीचा पुनर्विकास अखेर मार्गी; मुंबई पोर्ट ट्रस्टने तयार केला प्रस्ताव

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रासाठी पालिकेकडून २० कोटींचा निधी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा