Advertisement

चैत्यभूमीवर कडेकोट बंदोबस्त

महापरिनिर्वाणदिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईसह राज्यभरातून हजारो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. त्यानुसार मुंबई पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

चैत्यभूमीवर कडेकोट बंदोबस्त
SHARES

महापरिनिर्वाणदिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईसह राज्यभरातून हजारो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. त्यानुसार मुंबई पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर रेल्वे स्थानकावरील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

चैत्यभूमीवर बहुतांश अनुयायी हे दादर रेल्वे स्थानकाहून येतात. त्यावेळी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी  मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. तर गर्दीवर सीसीटिव्हीद्वारे लक्ष ठेवलं जाणार आहे. महत्वाच्या चौकात टेहळणी चौक्याही उभे करण्यात आल्या आहेत. गर्दीत चेंगराचेंगरी रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी १ हजार पोलिसांचा फौजफाटा नागरिकांना रस्ते मोकळे करून देण्यासाठी आणि सुरक्षेच्या उद्देशाने तैनात केला आहे. तर स्थानक परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने मेटल डिटेक्टर महत्वाच्या दरवाजांवर उभे करण्यात आले आहे.

त्याचबरोबर राज्यातून तसंच देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. १ अतिरिक्त पोलीस आयुक्त, ५ पोलीस उपायुक्त, ६ सहाय्यक पोलीस आयुक्त, १००  अधिकारी, १ हजार पोलीस कर्मचारी असा ताफा सज्ज ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर बाँम्बशोधक पथक, श्वानपथक, दंगलविरोधी पथक, राज्य राखीव दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत.



हेही वाचा -

महापरिनिर्वाण दिन: 'या' गाड्यांना जादा डबे जोडण्यात येणार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा