Advertisement

महापरिनिर्वाण दिन: 'या' गाड्यांना जादा डबे जोडण्यात येणार

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे प्रशासनानं १२ अनारक्षित फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

महापरिनिर्वाण दिन: 'या' गाड्यांना जादा डबे जोडण्यात येणार
SHARES

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येनं अनुयायी दादर येथील चैत्यभूमी इथं येतात. राज्याच्या अनेक भागातून हे अनुयायी येत असल्यामुळं त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं १२ अनारक्षित फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर ते सीएसएमटी या मार्गावर ३ फेऱ्या, सीएसएमटी-दादर ते सेवाग्राम, अजनी, नागपूर या मार्गावर ६ फेऱ्या, अजनी ते सीएसएमटी मार्गावर १ फेरी आणि सोलापूर ते सीएसएमटी या मार्गावर २ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तसंच, काही गाड्यांना जादा डबे जोडण्यात येणार आहेत.

गाड्यांचं वेळापत्रक

  • गाडी क्रमांक ०१२६२ ही विशेष गाडी ४ डिसेंबरला रात्री ११.५५ वाजता नागपूरहून सुटणार असून, सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी दुपारी २.३५ वाजता पोहोचणार आहे.
  • गाडी क्रमांक ०१२६४ ही विशेष गाडी ५ डिसेंबर रोजी नागपूरहून सकाळी ७.५० वाजता सुटणार असून, सीएसएमटीला त्याचदिवशी रात्री १२.१० वाजता पोहोचणार आहे.
  • गाडी क्रमांक ०१२६६ विशेष गाडी नागपूरहून ५ डिसेंबरला दुपारी ३.५५ वाजता सुटणार असून, ही गाडी सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३५ वाजता पोहोचणार आहे. या विशेष गाडीला अजनी, सेवाग्राम, वर्धा, फुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.
  • गाडी क्रमांक ०१२४९ सीएसएमटी-अजनी विशेष गाडी ६ डिसेंबरला दुपारी ४.०५ वाजता सीएसएमटीहून सुटणार आहे.
  • गाडी क्रमांक ०१२५१ सीएसएमटी-सेवाग्राम विशेष गाडी ६ डिसेंबरला संध्याकाळी ६.४० वाजता सीएसएमटीहून सुटणार आहे.
  • गाडी क्रमांक ०१२५३ दादर-अजनी विशेष गाडी ७ डिसेंबरला रात्री १२.४० वाजता दादरहून सुटणार आहे.
  • गाडी क्रमांक ०१२५५ सीएसएमटी-नागपूर विशेष गाडी दुपारी १२.३५ सीएसएमटीहून सुटणार आहे.
  • गाडी क्रमांक ०१२५७ सीएसएमटी-नागपूर विशेष गाडी ८ डिसेंबरला संध्याकाळी ६. ४० वाजतासीएसएमटी सुटणार आहे. 
  • गाडी क्रमांक ०१२५९ दादर-अजनी विशेष गाडी रात्री १२.४० वाजता दादरहून सुटणार आहे.
  • गाडी क्रमांक ०२०४० अजनी-सीएसएमटी सुपरफास्ट गाडी ७ डिसेंबरला दुपारी ३ वाजता अजनीहून सुटणार असून, ही गाडी सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी पहाटे ५.१० वाजता पोहोचणार आहे.
  • गाडी क्रमांक ०१३१५ सोलापूर-सीएसएमटी विशेष गाडी ५ डिसेंबरला सायंकाळी ५.२० वाजता सुटणार असून, ही गाडी सीएसएमटीला रात्री १.२० वाजता पोहोेचेल.
  • गाडी क्रमांक ०१३१६ सीएसएमटी-सोलापूर विशेष गाडी ७ डिसेंबरला रात्री १२.२५ वाजता सुटणार असून, ही गाडी सकाळी १०.१० वाजता सोलापूरला पोहोचणार आहे. या गाडीला कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण आणि दादर या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

या गाड्यांना जादा डबे

५ डिसेंबरला भुसावळ-सीएसएमटी पॅसेंजर गाडीला सामान्य द्वितीय श्रेणीचे २ डबे, सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजरला ७ डिसेंबर रोजी सामान्य द्वितीय श्रेणीचे २ डबे, सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसला ५ आणि ६ डिसेंबरला सामान्य द्वितीय श्रेणीचा १ डबा जोडण्यात येणार आहे.



हेही वाचा -

व्होडाफोन-आयडीया, जिओ, एअरटेलनं केली 'इतकी’ शुल्कवाढ

लोंढ्यांना रोखण्यासाठी NRC प्रमाणे SRC लागू करण्यात यावी, संदीप देशपांडे यांची मागणी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा