लाचखोर पोलीस फरार

 Chembur
लाचखोर पोलीस फरार

मुंबई - अटकेची कारवाई टाळण्यासाठी एका आरोपीकडे पाच लाखांची मागणी करणाऱ्या आरसीएफ पोलीस ठाण्यातील दोघांवर एसीबीनं शुक्रवारी गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी एका व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक राजेश चंदगुडे, पोलीस हवालदार राजेंद्र महाडिक आणि सतीश आठवले अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांनी आरोपींकडे पाच लाखांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार याने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर एसीबी अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. मात्र याची माहिती मिळताच चंदगुडे आणि महाडिक यांनी पळ काढला. मात्र एसीबीनं एका व्यक्ती ला अटक केली असून दोन्ही पोलिसांचा शोध सुरू केला आहे.

Loading Comments