Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारणार कशी? अर्थसंकल्पात तरतूदच नाही

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही.

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारणार कशी? अर्थसंकल्पात तरतूदच नाही
SHARES

मुंबई महापालिकेच्या २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात (BMC Budget 2020) उद्यानांच्या प्रगतिपथासाठी २५४.१८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळं आता, मियावाकी पद्धतीनं वृक्षारोपण करत, मुंबईत नागरी वनाचे आच्छादन वाढविण्यात येणार आहे.परंतु, असं असलं तरी मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. हवेची गुणवत्ता खराब होत असल्यानं नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. मात्र, पर्यावरणप्रेमींनी अर्थसंकल्पात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तरतूद न केल्यानं नाराजी व्यक्त केली आहे. 

मंगळवारी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात आपत्कालीन व्यवस्था, अग्निशमन दल आणि पर्यावरणअशा विभागांसाठी महापालिकेनं रकमेची तरतुद केली आहे. उद्यानांच्या कामाच्या प्रगतीसाठीही ठोस तरतुदी केली आहे. मात्र, दिल्लीप्रमाणेच मुंबईच्या हवेची गुणवत्ता खराब होत असून, याकडं दुर्लक्ष केलं आहे.

वांद्रे-कुर्ला संकुल, माझगाव, अंधेरीसह चेंबूर येथील हवेची गुणवत्ता दिवसागणिक खराब होत चालली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेली बांधकामं, सुरू असलेली रस्त्यांची कामं, रस्त्यांवर दररोज वाढत असलेली वाहनं आणि त्यातून निघणारा धूर यासांरख्या अनेक घटकांमुळं मुंबई प्रदूषित होत आहे.

मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळं वातावरणातील धूळीकणांचं प्रमाण वाढत आहे. रस्त्याच्या कामांदरम्यान उडणारी धूळ कमी करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस अशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळं वातावरणातील धूळीचा मुंबईकरांना त्रास होत आहे. दरम्यान, मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, 'स्वच्छ हवा कृती आराखडा' याबाबत प्रशासनानं ढिसाळ धोरण अवलंबल्याने ठोस अशी कार्यवाही होताना दिसत नसल्याचं पर्यावरणप्रेमींनी म्हटलं आहे.हेही वाचा -

विश्व हिंदू महासभेच्या अध्यक्षांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला मुंबईतून अटक

कंपनी सेक्रेटरीसाठी प्रवेश परीक्षा, 'फाऊंडेशन' परीक्षा रद्दसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा