कुभांरवाड्यात दूषित पाणीपुरवठा

 Dharavi
कुभांरवाड्यात दूषित पाणीपुरवठा
कुभांरवाड्यात दूषित पाणीपुरवठा
कुभांरवाड्यात दूषित पाणीपुरवठा
See all

कुंभारवाडा - अपुरा आणि दूषित पाणीपुरवठ्यामुळे सी विभागातले रहिवासी त्रस्त झाले आहेत. आरोग्याचा प्रश्न भेडसावत असल्याने इथल्या रहिवाशांना पाण्याची मोटर बसवणे भाग पडत आहे. या विभागातील बहुसंख्य जलवाहिन्या जुनाट झाल्या आहेत. त्या वेळीच न बदलल्याने पाण्याचा दूषित प्रश्न निर्माण झाला आहे.

या ठिकाणी भूमिगत जलवाहिन्यांच्या बाजूलाच नाले असल्याने नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. नगरसेवकांनी पाच वर्षात पाण्याच्या समस्येकडे लक्षच दिले नसल्याची तक्रार इथल्या रहिवाशांनी केली आहे. या विभागातल्या दुर्गा देवी उद्यानात नगरसेवक युगंधरा साळेकर यांनी भूमिगत पाण्याची टाकी बाधंली आहे, पण त्याचा काहीच उपयोग होत नासल्याचं इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे. तर नक्की ही पाण्याची टाकी कुणासाठी बांधण्यात आली? याचा निधी नक्की कशासाठी वापरण्यात आला? असे प्रश्न सामाजिक कार्यकर्ते दीपक कदम यांनी उपस्थित केलेत.

Loading Comments