दादर भागात इमारत कोसळली

दादर - एकच आवाजा झाला आणि इमारतीचा एक भाग पत्त्यासारखा कोसळला. दादरच्या हिंदू कॉलनीतल्या जुन्या इमारतीचे तोडकाम चालू होते. काम चालू असाताना इमारतीचा एक भाग कोसळला. त्यावेळी तिथे उभी असलेली MH 02 CR 6167 ही कार मलब्याखाली दबली गेली. या घटनेत गाडीच्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झालाय. ढिगाऱ्याखाली दबली गेलेली ओला कार असल्याची माहिती आहे.

Loading Comments