Advertisement

सावित्रीबाई फुले-महात्मा फुले यांना भारतरत्न? केंद्राच्या हालचाली सुरू

फुले दाम्पत्याचं समाजासाठीचं, त्यातही स्त्री शिक्षणासाठीचं महान कार्य लक्षात घेता त्यांना मरणोत्तर भारतरत्न या देशातील सर्वाोच्च नागरी किताबानं सन्मानित करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

सावित्रीबाई फुले-महात्मा फुले यांना भारतरत्न? केंद्राच्या हालचाली सुरू
SHARES

भारतातल्या पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि थोर समाज सुधारक महात्मा फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होत आहे. ही मागणी लक्षात घेत केंद्रानं सावित्रीबाई फुले-महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. यासंबंधीची घोषणा २६ जानेवारीला होणार असल्याचंही समजतं.


सर्वच स्तरातून मागणी

फुले दाम्पत्याचं समाजासाठीचं, त्यातही स्त्री शिक्षणासाठीचं महान कार्य लक्षात घेता त्यांना मरणोत्तर  भारतरत्न या देशातील सर्वाोच्च नागरी किताबानं सन्मानित करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. मार्च २०१८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली होती. तर बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनीही सावित्रीबाई फुले-महात्मा फुले आणि कांशीराम यांना भारतरत्न देण्याची मागणी २०१५ मध्येच केली आहे.

फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळावा यासाठी राज्य सरकारनं केंद्राकडे शिफारस करावी अशी मागणीही अनेक संघटनांकडून केली जात होती. या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी केंद्राकडे शिफारस करू, अशी घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती.


 घोषणा २६ जानेवारीला?

त्यानुसार आता केंद्रानं सावित्रीफुले-महात्मा फुले यांना भारतरत्न देण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. तर यासंबंधीची घोषणा २६ जानेवारीला होण्याची शक्यता आहे. दरम्यान, फुले दाम्पत्यासह बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांनाही भारतरत्न देण्याची मागणी आहे. त्यानुसार कांशीराम यांनाही मरणोत्तर भारतरत्न बहाल केला जाणार असल्याचं समजतं आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा