समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली अाहे. मंगळवारी वरळी येथे ओबीसी महासंघाचं अधिवेशन पार पडले. यावेळी अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ओबीसी महामंडळाला ५०० कोटी रुपयांचा निधी देण्याचीही घोषणा केली.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा अशी शिफारश केंद्र सरकारकडे करण्यात अाल्याची माहिती ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात दिली. सरकारी नोकरीतील ओबीसी समाजाचा बॅकलॉग भरून काढण्याचं अाश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं. तसंच ओबीसी समाजातील युवकांना रोजगार मिळावा तसेच त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून ओबीसी महामंडळाला पुढील २ अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. ओबीसींच्या हितासाठी अनेक योजना राबवून यासाठी हात अाखडता घेतला जाणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा-
हिंसक आंदोलन थांबवा, मराठा आंदोलकांना न्यायालयाची सूचना
मराठा आरक्षण : मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला