SHARE

मराठा समाजाच्या आरक्षणावरून राज्यात पेटलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाची आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती पंतप्रधान मोदींना दिली.


मोदी फडणवीस बैठक

राज्यात मराठा समाजाचं आंदोलन तीव्र झालं आहे. हे वातावरण निवळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावून पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत मराठा आरक्षणासह राज्यातील विविध प्रश्नांबाबत   पंतप्रधानांशी चर्चा केल्याचं मुख्यमंत्र्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सांगितलं.


दानवे निवासस्थानी बैठक

भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री आणि भाजप खासदारांची बैठक भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी प्रकाश जावडेकर, राम शिंदेंसह पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या