Advertisement

आगीत कोणीही जळाले नाहीत, सर्वांचा गुदमरून मृत्यू


आगीत कोणीही जळाले नाहीत, सर्वांचा गुदमरून मृत्यू
SHARES

कमला मिलमधील मोजेस ब्रिस्टोल आणि पबला लागलेल्या आगीत १४ जणांचा गूदमरून मृत्यू झाल्याचं फोरेन्सिक विभागाने स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात आणखी तपासासाठी रक्ताचे नमुने ठेवण्यात आले असल्याचेही फोरेन्सिक विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

सगळे मृत्यू हे गुदमरल्यामुळे झाले आहेत. अधिक तपासासाठी मृतांच्या शरीराचा एखादा भाग ठेवण्याची गरज नाही. कारण सर्वांचा मृत्यू हा गुदमरल्यामुळे झाल्याचं स्पष्ट आहे. तरीसुद्धा रक्तातील विषाचं प्रमाण जाणून घेण्यासाठी आम्ही मृतांच्या रक्ताचे नमूने ठेवले आहेत. भाजल्याच्या खुणा फक्त १-२ मृतदेहावर आढळल्या आहेत.

- प्रो. राजेश ढेरे, फोरेंसिक मेडिकल

आगीची घटना घडल्यानंतर रात्री उशिरा १ च्या वाजेच्या दरम्यान पहिला रुग्ण केईएममध्ये आला. त्यानंतर एक-एक मृतदेह करत १४ मृतदेह आणण्यात आले. याचसोबत १२ जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

गुदमरल्यामुळेच १४ जणांचा मृत्यू झाला. १२ जणांना आता सोडण्यात आलं आहे. यातील काही लोक हे प्राथमिक उपचार घेऊन दुसरीकडे गेले आहेत.

- डॉ. अविनाश सुपे, अधीष्ठाता, केईएम रुग्णालय

शिवाय, सर्व मृतदेह आणल्यानंतर तत्काळ ४.१० वाजता शवविच्छेदन सुरू केलं. ते सकाळी ६.५० वाजता पूर्ण झालं. फक्त २ तासांत हे शवविच्छेदन पूर्ण झालं आहे. सकाळी १० वाजेपर्यंत १२ मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत, अशी माहीती डॉ. सुपे यांनी दिली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा