Advertisement

एस. व्ही. रोडवर खड्डेच खड्डे


एस. व्ही. रोडवर खड्डेच खड्डे
SHARES

पाऊस आणि रस्त्यांवरील खड्डे हे समीकरण मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. पावसाच्या आगमनानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत खड्डे दर्शनाला सुरुवात झाली आहे. त्याप्रमाणे मालाडच्या एस. व्ही. रोडवर देखील मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत.

खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

मालाड पश्चिमेकडून मामलेदारवाडी येथून मालाड स्टेशनला जाताना एस. व्ही. रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वरांना खड्डयांमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो.
या रस्त्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर पी उत्तर पालिका विभागाचे कार्यालय आहे. मात्र त्यांना हे खड्डे कसे दिसत नाही असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.


या खड्ड्यांमुळे प्रचंड त्रास होतो. येथे दिवसाला देखील अनेक अपघात झाले आहेत.
जयेश शहा, स्थानिक दुकानदार

याबाबत पी उत्तर पालिका विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगीता हसनाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.




हेही वाचा -

मुंबईकरांना यंदा पावसाळ्यात खड्डेमुक्त रस्ते - आयुक्त अजोय मेहता

खड्डे बघून पालिका कर्मचारी माघारी


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा