Advertisement

मुंबई महापालिका नगरसेवकांच्या 'प्रगती पुस्तकात' घसरण, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल

या वार्षिक प्रगतिपुस्तकात शिवसेनेचा क्रमांक घसरला आहे. पहिल्या १० नगरसेवकांमध्ये शिवसेनेच्या फक्त दोनच नगरसेवकांचा समावेश झाला आहे.

मुंबई महापालिका नगरसेवकांच्या 'प्रगती पुस्तकात' घसरण, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल
SHARES

मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या कामगिरीचे २०२० या वर्षांचे प्रगतिपुस्तक  प्रजा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने जाहीर केले आहे. या वार्षिक प्रगतिपुस्तकात शिवसेनेचा क्रमांक घसरला आहे. पहिल्या १० नगरसेवकांमध्ये शिवसेनेच्या फक्त दोनच नगरसेवकांचा समावेश झाला आहे. तर काँग्रेसने पहिला क्रमांक पटकावला असून दुसरा क्रमांक भाजपला देण्यात आला आहे. शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

 हे प्रगतीपुस्तक मांडताना नगरसेवकांचे शिक्षण, गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारी, न्यायालयातील याचिका, सभागृहातील हजेरी, सभेमध्ये उपस्थित केलेले प्रश्न, नगरसेवक निधीचा केलेला वापर या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो, असं प्रजा फाऊंडेशनकडून सांगण्यात आलं आहे

अहवालानुसार, पहिल्या दहामध्ये भाजपचे पाच, काँग्रेसचे तीन, तर शिवेसनेचे केवळ दोन नगरसेवक आहेत. भाजपचे नगरसेवक हरिश छेडा यांनी ८२.७ टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजपच्या नेहल शाह आहेत. त्यांना ८० टक्के गुण देण्यात आले आहेत. तर शिवसेनेचे अनंत नर हे ७९.९ टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. समाधान सरवणकर यांनी चौथा क्रमांक पटकावला आहे. अन्य नगरसेवकांमध्ये भाजपचे स्वप्ना म्हात्रे, आशा मराठे, प्रभाकर शिंदे, तर काँग्रेसचे रवी राजा, वीरेंद्र चौधरी, कमरजहाँ सिद्दीकी यांचा समावेश आहे.

नगरसेवक किती आणि कोणत्या दर्जाचे प्रश्न विचारतात याचाही आढावा या वेळच्या अहवालात घेण्यात आला आहे. या अहलावानुसार सभागृहात प्रश्न विचारण्याचे प्रमाण कमी झाल्याचं दिसून येत आहे. तसेच जनतेशी संबंधित प्रश्न विचारण्याचे प्रमाणही घटलं असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मलनि:सारण, कचरा, पाणी, रस्ते, पावसाचे पाणी तुंबणे अशा विषयांवरच्या जेवढ्या तक्रारी असतात त्या तुलनेत विचारलेल्या प्रश्नांचे प्रमाण दहा टक्क्यांच्या आत असल्याचं अहवालातून दिसून येत आहे.

नगरसेवकांना त्यांची नियमित कामं, सभागृहातील जबाबदाऱ्यांपेक्षा निवडणूक प्रचाराला प्राधान्य द्यावं लागल्यानं मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचा आलेख उतरता राहिल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. महत्वाची बाब म्हणजे कोरोना काळातील मदतकार्यात नगरसेवक आघाडीवर राहिले आहेत. शहरी नियोजनात नगरसेवकांची भूमिका महत्वाची राहिल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

पालिकेच्या २२७ पैकी १३ नगरसेवकांनी या वर्षी सभागृहात एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही. त्यात एमआयएमच्या दोन्ही नगरसेवकांचा समावेश आहे. काँग्रेसच्या निकिता निकम, सुप्रिया मोरे, विन्नी डिसुझा तर राष्ट्रवादीच्या मनीषा रहाटे, अखिल भारतीय सेनेच्य गीता गवळी, माजी महापौर शिवसेनेचे नगरसेवक मिलिंद वैद्य, संगीता सुतार, स्नेहल मोरे, मरियम्मल थेवर, ऊर्मिला पांचाळ, भाजपचे शिवकुमार झा, रंजना पाटील यांचाही त्यात समावेश आहे. त्यापैकी काँग्रेसच्या सुप्रिया मोरे, एमआयएमच्या गुलनाझ कुरेशी आणि राष्ट्रवादीच्या मनीषा रहाटे यांनी २०१७ पासून एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही.



हेही वाचा -

कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचे पालिका प्रशासनाचं आवाहन

बनावट ओळखपत्राद्वारे रेल्वे प्रवास; सर्वाधिक ओळखपत्र महापालिकेच्या नावानं



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा