नायगावमध्ये गुढीपाडवा शोभायात्राची जय्यत तयारी

 Naigaon
नायगावमध्ये गुढीपाडवा शोभायात्राची जय्यत तयारी

नायगाव - हिंदू नववर्षाचा शुभारंभ आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त दादर येथील नायगावमध्ये गुढीपाडवा येथे शोभायात्रा काढली जाणार आहे. मुंबईच्या गुढीपाडवा समितीच्या वतीने ही शोभायात्रा काढली जाणार आहे. दादरच्या नायगाव येथील शिंदेवाडी मैदानापासून ते नायगाव जुनी बीडीडी चाळ इथल्या भवानी माता मंदिरापर्यंत ही शोभायात्रा काढली जाणार आहे.

विशेष म्हणजे या शोभायात्रेत 'स्त्री भ्रूण हत्या' या विषयावर संदेश देण्यासाठी विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या महिलांच्या प्रतिमा लावण्यात येणार आहेत. तर यात्रेत सहभागी होणाऱ्या महिलांची स्पर्धा घेऊन एका लकी ड्रॉद्वारे 9 पैठणी साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी दादर - नायगाव गुढीपाडवा शोभायात्रा समितीची जय्यत तयारी सुरू असून अष्टभुजा ढोल ताशा पथकाचा सरावही सुरू आहे, अशी माहिती समितीचे प्रतिनिधी प्रशांत घाडीगावकर आणि अभय चव्हाण यांनी दिली.

Loading Comments