Advertisement

सणासुदीच्या तोंडावर एलपीजी गॅस महागला

इंडियन ऑईल काॅर्पोरेशनने १४.२ किलोचा अनुदानीत एलपीजी सिलेंडरचा दर बुधवारी मध्यरात्रीपासून ५०२.४० रुपयांवरून वाढवून ५०५.३४ रुपये केला अाहे. तर विनाअनुदानित सिलेंडर अाता ८८० रुपयांना मिळणार अाहे.

सणासुदीच्या तोंडावर एलपीजी गॅस महागला
SHARES

दिवाळी सण तोंडावर अाला असतानाच अनुदानित अाणि विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली अाहे.  अनुदानित सिलेंडर बुधवारपासून २.९४ रुपयांनी महागला अाहे. तर  विनाअनुदानित सिलेंडरच्या भावात ६० रुपयांची वाढ झाली अाहे. अनुदानित सिलेंडरच्या दरातील जूनपासूनची ही सहावी वाढ अाहे. अातापर्यंत या दरात १४.१३ रुपयांची वाढ झाली अाहे. 


बुधवारपासून दर लागू 

इंडियन ऑईल काॅर्पोरेशनने १४.२ किलोचा अनुदानीत एलपीजी सिलेंडरचा दर बुधवारी मध्यरात्रीपासून ५०२.४० रुपयांवरून वाढवून ५०५.३४ रुपये केला अाहे. तर विनाअनुदानित सिलेंडर अाता ८८० रुपयांना मिळणार अाहे. याअाधी हा दर ८२० रुपये होते. जागतिक बाजारात वाढलेले दर अाणि परकीय चलनाच्या दरात होत असलेला चढ-उतार यामुळे विनाअनुदानित सिलेंडर ६० रुपयांनी महागला असल्याचं इंडियन ऑईलने म्हटलं अाहे. 


अनुदानाची रक्कम वाढली

एलजीपी ग्राहकांना बाजारभावाप्रमाणे घरगुती गॅस सिलेंडर खरेदी करावा लागतो. एका वर्षातील १२ सिलेंडरवर सरकार अनुदानाची रक्कम थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करते. ग्राहकांच्या खात्यात अाता नोव्हेंबर २०१८ पासून प्रति सिलेंडर ४३३.६६ रुपये अनुदान जमा होणार अाहे. या अाधी अाॅक्टोबरमध्ये प्रति सिलेंडर अनुदानाची रक्कम ३७६.६० रुपये होती. 



हेही वाचा - 

कल्याणमध्ये विहिरीत बुडून ५ जणांचा मृत्यू; मृतात अग्निशमनचे २ जवान

नक्षलवादी कनेक्शन: नवलखा, तेलतुंबडे यांना न्यायालयाचा दिलासा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा