Advertisement

सोन्याला ३३ हजारांची झळाळी!

बुधवारी संध्याकाळी सोन्याचा भाव प्रति तोळा ३३ हजार रूपये इतका वधारला आहे. त्यामुळं लग्नसराईच्या निमित्तानं सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा खिशा जरा जास्तच रिकामी होणार आहे.

सोन्याला ३३ हजारांची झळाळी!
SHARES

आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या चढ-उतारामुळे ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. बुधवारी संध्याकाळी सोन्याचा भाव प्रति तोळा ३३ हजार रूपये इतका वधारला आहे. त्यामुळं लग्नसराईच्या निमित्तानं सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा खिशा जरा जास्तच रिकामी होणार आहे.


कारण काय?

शेअर बाजारातील चढउतार, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतीत होणारी घट, डॉलरच्या तुलनेत होणारी घसरण या कारणांमुळं सोन्याच्या किमतीत सातत्यानं वाढ होत आहे. दरम्यान येत्या काही दिवसात सोन्याचे भाव आणखी वाढणार असल्याची चर्चा सराफा बाजारात सुरू आहे.


सर्वसामान्यांच बजेट कोलमडणार

सध्या मुंबईतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा ३३ हजार रूपये आहे. दीड महिन्यापूर्वी हाच दर ३१ हजार रूपये होता. भविष्यात सोन्याचे दर आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळाले असल्याने ग्राहकांनी सोन खरेदीसाठी गर्दी केली आहे. ऐन लग्नसराईच्या मोसमात सोन्याचा दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट काहीसं कोलमडणार आहे.हेही वाचा - 

प्रियांका-सलमान ठरले 'बॉलीवूड ट्रेंडसेटर'!

मराठीमध्ये 'साइज झिरो' हिरोइनची एंट्री!संबंधित विषय