Advertisement

Samruddhi Express Way : समृद्धी महामार्गावर अपघात का होत आहेत?

गेल्या ९ महिन्यात समृद्धी महामार्गावर 1 हजार 282 अपघात झाले आणि यात 135 जणांचा मृत्यू झाला.

Samruddhi Express Way : समृद्धी महामार्गावर अपघात का होत आहेत?
SHARES

११ डिसेंबर २०२२ रोजी सुरू झालेला समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचे कारण म्हणजे गेल्या ९ महिन्यात समृद्धी महामार्गावर 1 हजार 282 अपघात झाले आणि यात 135 जणांचा मृत्यू झाला. पण हे अपघात नेमके का होत आहेत? याचामागे नेमकी काय कारणं आहेत? अपघात रोखण्यासाठी काय उपाय करणे आवश्यक आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत. 

डिसेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान किती झाले अपघात?

  • एकूण अपघात : 1,282
  • एकूण मृत्यू :135

अपघात होण्यामागची कारणे?

  • स्पीड लिमिट न पाळणे
  • स्पीड वाढल्याने टायर गरम होऊन फुटतात आणि अपघात होतात
  • टायर्सची खराब क्वालिटी
  • रोड हिप्लोटाइज
  • अचानक लेन बदलणे
  • चालकाकडून गाड्या महामार्गावर उभ्या करणे
  • आरटीओद्वारे कारवाईस्तव गाड्या महामार्गावर थांबवणे
  • प्राणी क्रॉसिंगमुळे अपघात 

RTO ची कारवाई

  • सप्टेंबरच्या मध्यापर्यंतची आकडेवारी उघड 
  • दररोज जवळपास 32 वाहनांचे चालान कापले जाते
  • लेन कटिंगसाठी 4,100 जणांवर कारवाई
  •  बेकायदेशीर पार्किंगसाठी 5,315 जणांवर कारवाई
  • वाहनांवर रिफ्लेक्टर नसलेल्या 2,143 कारवाई
  • एक्स्प्रेस वेवर ओव्हरस्पीडिंगसाठी सुमारे 450 जणांवर कारवाई

यावर काय उपाय करता येतील?

  • महामार्गावर प्रत्येकी शंभर किलोमीटरवरती थांबण्यासाठी स्पॉट पाहिजे.
  • दोन-तीन तास चालल्यानंतर चालकाचे लक्ष विचलित करण्यासाठी छोटे स्पीड ब्रेकर पाहिजेत.
  • महामार्ग सुरू होताना नायट्रोजन हवा चेक करण्यासाठी स्पॉट पाहिजे.
  • ड्रिंक आणि ड्राइव्ह टेस्ट करण्यासाठी चेक पोस्ट पाहिजे
  • ठिकठिकाणी ब्लॅक स्पॉट्स आणि धोकादायक वळणे चिन्हांकित केलेले पाहिजेत.
  • खराब टायर्स असलेल्या गाड्यांना एक्सप्रेस वेमध्ये प्रवेश नाकारला जावा.
  • ओव्हर स्पीडिंग आणि लेन कटिंग रोखण्यासाठी लक्ष दिले पाहिजे. 

11 डिसेंबर 2022 नागपूर येथे वायफळ टोलनाक्यावर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले. उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाची चाचणी मोहीम घेतली. शिर्डी ते नागपूर दरम्यान असलेला ५२० किमी लांबीच्या पहिल्या टप्प्यावर उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः कार चालवली होती. पण मागच्या 9 महिन्यापासून समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे.



हेही वाचा

Samruddhi Mahamarg ठरतोय मृत्यूचा सापळा? 9 महिन्यात 135 मृत्यू

समृद्धी महामार्गावर अपघातात 12 ठार तर 23 जखमी, चौकशीचे आदेश

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा