SHARE

मुंबई - राणीच्या बागेतील पेंग्विनच्या मृत्यूप्रकरणी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी चौकशीचे आदेश दिले असून, येत्या 29 नोव्हेंबरला हा अहवाल लोकायुक्तासमोर सादर केला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. दक्षिण कोरियाहून मुंबईत आणलेल्या आठ पेंग्विनपैकी एकाचा मृत्यू झाला होता. विरोधकांनी पेंग्विनच्या मृत्यूला शिवसेनेला जबाबदार धरत टीका केली होता. पेंग्विन मृत्यू प्रकरणी पालिकेतील विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली असून, लोकायुक्तांकडून सुनावणी सुरू आहे. पेंग्विनची चौकशी आणि कंत्राट मिळवणा-या कंपनीने खोटी कागदपत्रे सादर करून कंत्राट मिळवल्याचा आरोप छेड़ा यांनी केला आहे. तर केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणानेही पेंग्विनच्या मृत्यूची गंभीर दखल घेत पालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपायुक्त किरण आचरेकर यांना दिले आहेत. हा अहवाल 26 नोव्हेंबर रोजी पालिका आयुक्तांसमोर ठेवण्यात येणार आहे. तर 29 नोव्हेंबर रोजी लोकायुक्तांकडे समोर ठेवला जाणार असल्याचे समजते. दरम्यान, पेंग्विन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला काँग्रेसने केला आहे. त्यामुळे या चौकशी अहवालात कोणावर ठपका ठेवला जातोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या