Advertisement

ज्येष्ठांना पालिका रुग्णालयात संपूर्ण मोफत उपचार


ज्येष्ठांना पालिका रुग्णालयात संपूर्ण मोफत उपचार
SHARES

 मुंबईतील ६० वर्षांवरील अधिक वर्षे पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आता महापालिकेच्या रुग्णालयांसह दवाखाने व आरोग्य केंद्रांमध्ये मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना महापालिकेच्या रुग्णालय व दवाखान्यांमध्ये ५० टक्के सवलत वैद्यकीय उपचारात दिली जात होती. मात्र, आता सर्व ज्येष्ठ नागरिकांकडून तपासणीसह शस्त्रक्रियेसाठी एकही पैसा घेतला जाणार नाही.


२०१६ मध्ये प्रथम निर्णय

ज्येष्ठ नागरिकांना महापालिकेच्या रुग्णालयांतील सेवा सुविधांचा अधिकाधिक लाभ व्हावा यासाठी २०१६ मध्ये प्रथम निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार परिपत्रक लागू करण्यात आलं होतं. या परिपत्रकानुसार महापालिकेची सर्व रुग्णालय, दवाखाने आणि आरोग्य केंद्रांमध्ये तपासणीसाठी व शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या खर्चामध्ये ज्येष्ठांना ५० टक्के सवलत देण्यात येत आहे.

 

स्थायीच्या मान्यतेनंतर अंमलबजावणी

नोव्हेंबर २०१७ मध्ये सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठराव करून ज्येष्ठांवर मोफत वैद्यकीय उपचार करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यानुसार गटनेत्यांच्या सभेपुढे याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्याला मार्च महिन्यात मंजुरी मिळाल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभेपुढे ठेवला.

 सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा डॉ. अर्चना संजय भालेराव यांनी या प्रस्तावाचे स्वागत केलं अाहे. आरोग्य समितीच्या मंजुरीनंतर प्रस्ताव स्थायी समिती व महापालिकेच्या मान्यतेसाठी पाठवला जाईल. त्यांची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी रुग्णालयांमध्ये केली जाणार असल्याचे भालेराव यांनी सांगितले.



हेही वाचा -

अवघ्या ४१ अतिधाेकादायक इमारती जमिनदोस्त

जात वैधता प्रमाणपत्राशिवाय होणार प्रवेश प्रक्रिया



 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा